भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल मागील काही महिन्यांपासून यष्टीरक्षकाची भूमिका निभावत आहे. याबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, यष्टीमागे दिग्गज माजी कर्णधार एमएस धोनीची जागा घेण्याचा खूप मोठा दबाव असतो. कारण चाहत्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात.
धोनीने डिसेंबर २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच मागील वर्षी इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एकही सामना खेळलेला नाही.
राहुलने यावर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत यष्टीरक्षकाची भूमिका साकारली होती. तसेच न्यूझीलंड दौऱ्यादरम्यानही त्याने ही जबाबदारी स्विकारली होती.
राहुलने स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “जेव्हा मी भारताकडून यष्टीरक्षकाची जबाबदारी निभावत होतो, तेव्हा मी उदास होतो. कारण प्रेक्षकांमुळे माझ्यावर दबाव येत होता. जर जेव्हा तुम्ही चुकता, तेव्हा लोक विचार करतात की तुम्ही एमएस धोनीची जागा घेऊ शकत नाही.”
राहुल पुढे म्हणाला की, “धोनीसारख्या दिग्गज यष्टीरक्षकाची जबाबदारी स्विकारण्याचा दबाव खूप होता. कारण यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी स्विकारताना लोकांच्या मनात अशाप्रकारचा विचार येत असतो.”
आतापर्यंत ३२ वनडे आणि ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा राहुल म्हणाला की, यष्टीरक्षण त्याच्यासाठी नवीन काम नाही. कारण यापूर्वी आयपीएलदरम्यान तसेच रणजीतील आपल्या कर्नाटक संघासाठी ही भूमिका साकारली आहे.
राहुल म्हणाला की, “जे लोक क्रिकेटवर लक्ष ठेवतात, त्यांना माहिती आहे की, मी अनेक काळापर्यंत यष्टीरक्षणापासून दूर राहिलेलो नाही. कारण मी आयपीएल आणि कर्नाटककडून खेळताना ही जबाबदारी स्विकारली आहे.“
“मी नेहमी यष्टीरक्षणाच्या संपर्कात असतो. परंतु मी असाही व्यक्ती आहे, जो संघाच्या गरजेप्रमाणे कोणतीही भूमिका साकारण्यासाठी तयार असतो,” असेही राहुल पुढे म्हणाला.
राहुलने आतापर्यंत एकूण ३६ कसोटी सामने, ३२ वनडे सामने आणि ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत एकूण ३४.५८ च्या सरासरीने २००६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेत त्याने ४७.६५ च्या सरासरीने १२३९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ४५.६५ च्या सरासरीने १४६१ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताविरुद्ध सुप्पर डुप्पर फ्लाॅप ठरलेल्या खेळाडूवर ३ वर्षांची बंदी
-क्रिकेट जगताने वाहिली इरफान खानला श्रद्धांजली
-अख्तरने केला होता जगाला चक्रावुन टाकणारा विक्रम, पण आयसीसी झाली होती व्हिलन