---Advertisement---

दुखापतग्रस्त असूनही रोहितने गाजवले मैदान! चाहते म्हणाले, ‘कॅप्टन असावा तर असा’

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 4:42 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या (WIvsIND) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने वनडे मालिका ३-० अशी जिंकली, तर टी२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रोहित भारताचा झेंडा हातात घेतलेल्या लहान मुलांसोबत फोटो काढताना दिसला आहे. त्याच्या या फोटोने चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्यातील काहींनी म्हटले, कर्णधार असावा तर असा.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासोबत सलामीला आला. मात्र तो दुखापतग्रस्त झाल्याने लवकरच तंबूत परतला. त्याने पाच चेंडूमध्ये ११ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. तसेच या सामन्यात पुन्हा तो मैदानात उतरला होता. त्याने सामना जिंकल्यावर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्याने त्याच्या दुखापतीबाबतही अपडेट दिले आहेत.

रोहित म्हणाला, “आता सध्या ठीक वाटत आहे. पुढील सामन्यासाठी खूप दिवस बाकी असून तोपर्यंत माझी दुखापत सुधारेल अशी आशा आहे.” पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. तर भारताने मंगळवारी (२ ऑगस्ट) झालेला तिसरा सामना ७ विकेट्सने जिंकला.

https://twitter.com/ashrohitian2/status/1554557874172350465?s=20&t=-4ObKVeNvxQwm0ok5wdcww

भारताने तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १९ षटकात ३ विकेट्स गमावत हे लक्ष्य पार केले.

या टी२० मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्टला खेेळला जाणार आहे. यातील पहिले तिन्ही सामने वेस्ट इंडिजमध्येच झाले असून शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळले जाणार आहे. मात्र हे सामने फ्लोरिडा, अमेरिका येथे खेळले जातील की नाही याबाबत शंका आहे. कारण दोन्ही संघांच्या काही खेळाडूंना व्हिजा मिळाला नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

CWG 2022 | पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात ४ पदकांची भर, वाचा खेळाडूंची कामगिरी

टीम इंडियाबरोबर एशिया कपमध्ये दोन हात करण्यासाठी पाक संघाची घोषणा, पाहा संपुर्ण संघ

‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---