इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा रणसंग्राम सुरू झाला आहे. या हंगामातील चौथा सामना नव्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीदरम्यान खेळवला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना गुजरातने ५ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. लक्षवेधी बाब अशी की, त्याने १-२ वर्षांनंतर नव्हे तर चक्क ११ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुन्हा पाऊल ठेवले आहे.
एका दशकानंतर मॅथ्यू वेडचे (Matthew Wade) आयपीएलमध्ये पुनरागमन (Comeback In IPL) झाले आहे. तो गुजरात संघाकडून (Gujrat Titans) मैदानात उतरला होता. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या खेळाडूला त्याच्या पुनमरागमनासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागली आहे. मॅथ्यू वेडने २०११ साली दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि याचवर्षी त्याने शेवटचा आयपीएल सामनाही खेळला होता. त्यानंतर मात्र तो आयपीएलमध्ये दिसला नव्हता. अखेर आता १० वर्षे आणि ३११ दिवसांनंतर लखनऊविरुद्ध आयपीएलमधील पुनमरागमनाचा (Comeback In IPL After 11 Years)सामना खेळला आहे.
दोन आयपीएल सामने खेळण्यातील सर्वाधिक अंतर
१० वर्षे ३११ दिवस – मॅथ्यू वेड २०२२, गुजरात टायटन्स (२०११ संघ दिल्ली कॅपिटल्स)
७ वर्षे ३०७ दिवस – कॉलिन इंग्राम २०१९, दिल्ली कॅपिटल्स (२०११ दिल्ली कॅपिटल्स)
६ वर्षे १२२ दिवस – जिमी निशाम २०२०, पंजाब किंग्स (२०१४ दिल्ली कॅपिटल्स)
५ वर्षे ३५७ दिवस – श्रीवत्स गोस्वामी २०१८, सनरायझर्स हैदराबाद (२०१२ राजस्थान रॉयल्स)
मॅथ्यू वेड बनलाय आणखी जास्त घातक
गुजरातकडून आयपीएलमध्ये पुनरागमन करताना मॅथ्यू वेडने दमदार प्रदर्शन केले. १०३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४ चौकारांच्या मदतीने त्याने ३० धावा केल्या. तसेच यष्टीमागे लखनऊचा कर्णधार केएल राहुल याचा झेलही टिपला.
वेडला मेगा लिलावात गुजरात संघाने २ कोटी ४० लाखांना विकत घेतले होते. ऑस्ट्रेलियाला टी२० विश्वचषक २०२१ जिंकून देण्यात वेडचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे मेगा लिलावात बऱ्याच फ्रँचायझींचे त्याच्यावर लक्ष होते. त्याने टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरी सामन्यात सलग ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. पुढे संघाने अंतिमसामन्यात न्यूझीलंडवर सोपा विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलला नावं ठेवणाऱ्यांनो; IPLमधून देशाला काय मिळतं? बातमी वाचा समजेल
कृणालने बाद केल्यानंतर काय वाटले? हार्दिक म्हणतो, ‘जर आम्ही पराभूत झालो असतो तर…’
IPL2022| हैदराबाद वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!