fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हा खेळाडू पाचव्यांदा खेळणार प्रो कबड्डीची फायनल

प्रो कबड्डी सीजन ७ चा अंतिम सामना आज(१९ ऑक्टोबर) होत आहे. दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वारियर्स यांच्यात हा अंतिम सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे. हा प्रो कबड्डी लीगची सातवा अंतिम सामना आहे. तसेच हा अंतिम सामना विशाल मानेसाठी खास ठरणार आहे. तो पाचव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे.

प्रो कबड्डीचे ५ अंतिम सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष गोष्ट म्हणजे याआधी प्रो कबड्डीत कोणत्याही संघानेही पाच अंतिम सामने खेळलेले नाही. पण आज विशाल माने पाचव्यांदा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.

प्रो कबड्डी सीजन १, २ व ३ मध्ये यु मुंबाकडून विशाल माने अंतिम सामने खेळला होता, तर सीजन ५ मध्ये पटना पायरेट्सकडून अंतिम सामना खेळला होता. आजच्या अंतिम सामन्यात तो दबंग दिल्लीचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विशेष म्हणजे प्रो कबड्डी सीजन २ मध्ये यु मुंबा व सीजन ५ मध्ये पटना पायरेट्सने विजेतेपद पटकावले होते. दोन्ही वेळा विशाल माने त्या संघाचा भाग होता.

You might also like