जेव्हा कोणताही खेळाडू खेळात करियर बनवायचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्या देशासाठी खेळायचे हे त्याचे स्वप्न असते. जेव्हा त्याचे हे स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्याला वाटते, आपण आपल्या देशाचे नेतृत्व करावे. क्रिकेटच्या मैदानावर तर कॅप्टनला वेगळाच मान अन् अदब मिळते. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गजांना आपल्या देशाचा झेंडा बुलंद करण्याचे नशीब लाभल. कपिल देव आणि एमएस धोनी तर वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन बनले. सचिन, द्रविड, कुंबळे, गांगुली या दिग्गजांना देखील हा मान मिळाला. पण त्याचवेळेस भारतीय क्रिकेटसाठी अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या काहींना मात्र हे सौभाग्य मिळाले नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच काही मोजक्या स्टार इंडियन क्रिकेटर्सबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांनी परफार्मन्स तर टॉप दिला पण देशाचा कॅप्टन म्हणून त्यांना मिरवता आले नाही.
ज्या ज्या वेळी भारताला न लाभलेल्या कॅप्टनचा विषय निघतो तेव्हा, सर्वांच्या तोंडी पहिले नाव येते युवराज सिंगचे. युवराज सिंग म्हणजे २१ व्या शतकातील भारताचा सर्वात मोठा मॅचविनर. दोन वर्ल्डकप मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा. फॅन फॉलोविंग आणि स्टार पावर ही जबरदस्त, पण कॅप्टन काय तो झाला नाही.
हेही पाहा- भारताचे ५ दिग्गज क्रिकेटर, जे कधीही होऊ शकले नाहीत कर्णधार
युवराज सिंग
तब्बल १७ वर्षाचे इंटरनॅशनल करियर अन् ४०० पेक्षा जास्त मॅचेस युवराजच्या वाट्याला आल्या, पण देशाचा कॅप्टन म्हणून यापैकी एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. त्याच्या मागून आलेले एमएस धोनी अन् विराट कोहली टीम इंडियाचे ऑल टाईम ग्रेट कॅप्टन बनले. इतकंच काय रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, सुरेश रैना यांनादेखील इंडियाज कॅप्टन म्हणून टेंभा मिरवण्याचा मान मिळवला. आजही युवराजला कॅप्टन्सीच्या बाबतीत शापीत गंधर्वच मानलं जातं.
हरभजन सिंग
युवराजचाच खास जोडीदार आणि एज ग्रुप क्रिकेटपासून इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत युवराजची साथ न सोडणारा हरभजन सिंगही कॅप्टन्सीच्या बाबतीत दुर्दैवीच. हरभजन त्या मोजक्या क्रिकेटरपैकी एक आहे ज्याने भारतासाठी २०० पेक्षा जास्त वनडे अन् १०० पेक्षा जास्त टेस्ट खेळल्या. दोन वर्ल्डकप विनिंग टीमचा मेंबर असलेला भज्जी कॅप्टन्सी मटेरियल होता हे नक्की. मुंबई इंडियन्सला चॅम्पियन लीग चॅम्पियन त्यानच बनवलं, पण देशाचा विचार करायला गेलं तर त्याच्या पदरी पडली फक्त निराशाच.
जवागल श्रीनाथ
इंडियन क्रिकेटचा आजवरचा इतिहास लिहिला गेला तर, टॉप थ्री फास्ट बॉलर्समध्ये एक नाव असेल मैसूर एक्सप्रेस जवागल श्रीनाथच. श्रीनाथ भारताचा आतापर्यंतचा तरी सर्वात फास्ट बॉलर. ३०० पेक्षा जास्त इंटरनॅशनल मॅच खेळला तरी भारताचा पहिला फास्ट बॉलिंग कॅप्टन व्हायचं नशीब त्याला लाभले नाही. तब्बल बारा वर्षे तो इंडियन बॉलिंग डिपार्टमेंटचे नेतृत्व मात्र करत राहिला. विशेष म्हणजे त्याच्यानंतर आजतागायत ही संधी कोणत्याही फास्ट बॉलरला मिळू शकली नाही. समाधानाची बाब इतकीच की जसप्रीत बुमराहने व्हाईस कॅप्टनपर्यंत मजल मारलीये.
अजित आगरकर
एकेकाळी कपिल देव यांचा खरा वारसदार म्हणून अजित आगरकरकडे पाहिले जायचे. आपल्या ऑलराऊंड एबिलिटीने त्याने विक्रमांचे इमले रचले. आगरकर भारतासाठी १९१ वनडे खेळला. आपल्या ८-९ वर्षाच्या करियरमध्ये आगरकर अगदी कन्सिस्टंटली टीम इंडियाचा भाग होता. या काळात टीम इंडियाला सात कॅप्टन मिळाले पण त्यापैकी आगरकर नव्हता. आजही अनेक जण म्हणत असतात, आगरकरमध्ये तितकी क्षमता नक्कीच होती की, तो टीम इंडियाचा कॅप्टन बनू शकला असता.
रवींद्र जडेजा
या लिस्टमध्ये सध्या सर्वात लेटेस्ट नाव आहे रवींद्र जडेजाच. जडेजा नुकताच आयपीएलमध्ये चेन्नईचा कॅप्टन बनलाय. त्याच्या आजवरच्या करिअरवर एक नजर टाकल्यास तो १६८ वनडे अन् ६० टेस्ट खेळलाय. तो टीम इंडियाचा स्तंभ आहे पण सध्यातरी कॅप्टन म्हणून तो कोणत्याच योजनेत नाही. त्याच्यानंतर बर्याच दिवसांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलेल्या केएल राहुलनेही इंडियाचा कॅप्टन व्हायचा मान मिळवलाय. कॅप्टन म्हणून आयपीएलमधील त्याचा परफॉर्मन्स पाहून त्याला, देशाचा कॅप्टन व्हायची संधी मिळणारच नाही असं दिसतंय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती
आयपीएलने भारताला दिलेला पहिला टी२० स्टार होता युसुफ, इरफानचा भाऊ ओळख पुसत त्याने स्वत:ची बनवलेली ओळख
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत