---Advertisement---

IND vs ENG: कर्णधार गिलच्या नावावर नकोसा विक्रम, क्रिकेटविश्वात खळबळ

On: गुरूवार, जुलै 10, 2025 10:47 PM
---Advertisement---

भारतीय संघाने (Indian cricket team) मागील काही सामन्यांमध्ये चांगला खेळ केला आहे, पण या काळात संघाला नशीबाची फारशी साथ मिळालेली नाही. नवीन कर्णधार शुबमन गिलदेखील (Shubman gill) हा देखील संघाचे नशीब बदलू शकला नाही. याच कारणामुळे लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याच्या नावावर एक अतिशय लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. जो तो आता कितीही प्रयत्न केले तरी सुधारू शकणार नाही. या लाजीरवाण्या विक्रमाशी भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टी20 आंतरराष्ट्रीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे (Suryakumar yadav) देखील नाव जोडले गेले आहे.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात टॉस हरताच भारतीय संघाच्या नावावर हा लाजीरवाणा विक्रम नोंदला गेला. भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग 13 सामन्यांमध्ये टॉस हरला आहे. हे 31 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहे आणि 10 जुलैपर्यंत चालूच आहे. या काळात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताचे नेतृत्व केले आहे.

या काळातील चांगली गोष्ट म्हणजे, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताने खेळ चांगला केला आहे. लॉर्ड्समध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडीजने 2 फेब्रुवारी 1999 पासून 21 एप्रिल 1999 पर्यंत सलग 12 सामन्यांत टॉस हरला होता. त्या वेळी वेस्ट इंडीजसाठी जिम्मी अ‍ॅडम्स, कार्ल हूपर आणि ब्रायन लारा यांनी कर्णधारपद सांभाळले होते.

भारतीय संघाचा नवीन कसोटी कर्णधार शुबमन गिल आपल्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये एकदाही टॉस जिंकू शकला नाही. लॉर्ड्सच्या उत्कृष्ट फलंदाजी खेळपट्टीवर इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---