आयसीसी टी20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup) 24व्या सामन्यात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात गुरूवारी (27 ऑक्टोबर) थरारक लढत बघण्यास मिळाली. झिम्बाब्वेने दिलेल्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने 94 धावासंख्येवरच आपले 6 गडी गमावले. पाकिस्तानला सहावा झटका शान मसूद याच्या रुपात लागला. त्याचीच विकेट पाकिस्तानच्या पराभवाचे आणि झिम्बाब्वेच्या विजयाचे कारण ठरली.
शान मसूद (Shan masood) हा क्रिझवर होता. मसूदला 16व्या षटकात सिकंदर रझा ( Sikandar Raza) ने त्याच्या फिरकीच्या जाळात अडकवले. सिकंदरच्या या षटकातला दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता, ज्यावर मसूद पुढच्या पायावर येउन फ्लिक करु इच्छित होता पण चेंडू हुकला आणि त्याचा शरीरावरील ताबा सुटला.
सिकंदरच्या उत्कृष्ठ चेंडूवर मसूदने चकमा खाल्ला आणि यष्टीरक्षक रेजिस चकाब्वा (Regis Chakabva) याने अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केले. चकाब्वाने चित्त्याच्या स्फुर्तीने स्टम्पिंग केली. यावर पंचाने देखील त्याला बाद घोषित केलं. या स्टम्पिंगने सामन्याची दिशाचं बदलून टाकली. या स्टम्पिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांसाठी ठासून रोमांच भरलेला होता. पाकिस्तानी प्रेक्षकांनी स्वप्नातही विचार केला नसेल की आपल्या संघाला झिम्बाब्वेच्या हातून पराभव स्वीकारावा लागेल. झिम्बाब्वेच्या या यशात त्यांच्या गोलंदाजांचे खूप मोठ श्रेय आहे. सिकंदरबरोबरचं त्याच्या सहकारी गोलंदाजांनी देखील चिवटं गोलंदाजी करत पाकिस्तानी फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. रझाने 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
OMG what a piece of glove work by Chakabva 🔥🔥🔥🔥
Go Zimbabwe #PAKvsZIM #ZimVsPak pic.twitter.com/MxCdXBzo0y
— Effort de Guerre (@Observateurfang) October 27, 2022
एकेकाळी दुबळा समजला जाणारा झिम्बाब्वे संघ आता दुबळा राहिलेला नाही, याची झलक या विश्वचषकात त्यांनी पाकिस्तान विरूद्ध दिलीचं आहे. भारतासाठी देखील ही धोक्याची सुचना आहे. भारताला आता सावध राहण्याची गरज आहे. भारताचा झिम्बाब्वेशी सामना 6 नोव्हेंबरला रंगणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या विस्फोटक फलंदाजाच्या यशामागील गुपीत काय? खुलासा करत म्हणाला, ‘आता मला कसली भीती’
पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाने झिम्बाब्वेचा संघ मैदानातच नाचू लागला, व्हिडिओ एकदा पाहाच