---Advertisement---

RCB vs PBKS: विरेंद्र सहवाग यांनी खास अंदाजात केली भविष्यवाणी, ‘हा’ संघ ठरणार चॅम्पियन!

---Advertisement---

आता जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू(Royal Challengers bangaluru Vs Punjab kings) आणि पंजाब किंग्स संघ आयपीएलच्या फायनलमध्ये आमने-सामने आहे. तर अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंचं भविष्यवाणी करण्याचं काम सुरू आहे. यावेळी नवा चॅम्पियन कोण असेल? याचविषयी माजी भारतीय दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सहवाग (Virendra Sehwag) यांनी खास अंदाजात आरसीबीला विजेता घोषित केले आहे. त्यांनी मोकळ्या पणाने आरसीबीचे नाव घेतले, पण त्यांच्या आधीच्या अनलकी फॉर्मुल्यामध्ये पंजाबचं नाव सुद्धा लपवलेलं होतं.

एका वेबसाईटवर बोलताना सहवाग यांनी म्हटले, मला वाटते की आरसीबी विजेता ठरेल, कारण ज्या संघाला मी पाठिंबा देतो तो संघ पराभूत होतो. मग सामना गुजरात विरुद्ध मुंबई असो किंवा पंजाब विरुद्ध आरसीबी. म्हणजेच हे स्पष्ट होतं की, त्यांना वाटत आहे पंजाब किंग्स जिंकेल. पण जर त्यांनी पंजाबला पाठिंबा दिला तर पंजाब पराभूत होईल असं त्यांना वाटत आहे.

पुढे बोलताना सहवाग म्हणाले, मी या फायनल विषयी जुन्या फॉर्म्युलाचा वापर करत आहे. म्हणजे त्यांनी क्वालिफायर दोनमध्ये पंजाब विरुद्ध मुंबईच समर्थन केलं होतं, पण ते पराभूत झाले. आता मी म्हणत आहे, आरसीबी जिंकेल तर बघू काय होतंय. याचाच अर्थ सहवाग यांनी म्हटले आहे की त्यांनी जरी मोकळेपणाने आरसीबीचं समर्थन केलं असलं, तरीही सुद्धा त्यांच्या अंदाजाने पंजाब संघ विजेता आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---