श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे दरम्यान सध्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. रविवारी(14 जानेवारी) या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात अंतिम चेंडूवर श्रीलंका संघ विजयी झाला. सामन्यानंतर झिंबाब्वे संघाचा कर्णधार सिंकंदर रजा याने आपल्या संघाच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
कर्णधाराची अष्टपैलु कामगिरी ठरली निष्फळ
अतिशय अटीतटीच्या राहिलेल्या या सामन्यात सुरवातीला श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वे संघ 20 षटकांमध्ये एकूण 143 धावा करण्यात यशस्वी झाला. यामध्ये संघाची धुरा सांभाळली कर्णधार सिकंदर रजाने. त्याने 42 चेंडूत 62 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणी 2 षटकार ठोकले. याच्या प्रतिउत्तरात मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 14 षटकात कोलमडला. सिंकदर रजाने वयक्तीक 3 विकेट मिळवल्या. यावेळी संघाची धावसंख्या होती 6 बाद 83. मात्र या अडचणीतून श्रीलंकेला बाहेर काढले अनुभवी खेळाडू ऍंजेलो मॅथ्यूजने. तो ही लढत शेवटच्या षटकापर्यंत घेउन गेला. शेवटच्या षटकात निर्धारीत 14 धावा करत श्रीलंकेने सामन्यात विजय मिळवला.
हा ग्रुप झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल – सिकंदर रजा.
सामन्यात जिंकण्यात अपयशी ठरलेला कर्णधार सिकंदर रजा समोलोचकाशी बोलताना म्हणाला, “आज आम्ही सर्वोत्कृष्ट ठरलो नाही, परंतु मला पुर्ण विश्वास आहे की हा ग्रुप झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य पलटेल.”
शेवटच षटक ठरलं रोमहर्षक
शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना श्रीलंकेच्या 6 विकेट गेलल्या असतानाही ऍंजेलो मॅथ्यूज तग धरुन होता. अशात झिंबाब्वेकडून शेवटच षटक टाकण्यासाठी आला ब्लेसिंग मुझारबनी. पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन चौकर मारुन मॅथ्यूजने त्याच्या संघाच पारडं जड केलं. नंतरच्या दोन चेंडूवर गोलंदाजाने पुनरागमण करत एक निर्धाव तर दुसऱ्यात थेठ मॅथ्युजला झेलबाद केले. आता शेवटच्या दोन चेंडूत सहा धावांची गरज असताना एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत श्रीलंकेने सामना जिंकला.
या दोन्ही संघात पुढचा सामना मंगळवारी(16 जानेवारी) याच मैदानावर खेळवला जाईल.(‘This’ team will brighten the fortunes of Zimbabwean cricket; The captain praised the team)
हेही वाचा
IND vs AFG: ‘पहिले कोहलीचे पाय धरले, नंतर मिठी मारली’, इंदूर मैदानात घुसलेल्या चाहत्याचं पुढे काय झालं पाहा
आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; डीन एल्गरला घ्यायची नव्हती निवृत्ती, प्रशिक्षकामुळे घ्यावा लागला निर्णय