हैद्राबाद| भारत आणि विंडिज यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून (12 आॅक्टोबर) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हैद्राबादच्या या मैदान परिसरात एक मंदिर आहे.
“सामान्यपणे हे मंदिर आपल्याला दिसत नाही. त्या मंदिराच्या पाठीमागे अनेक कल्पना आहेत. हे मंदिर 2011मध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर बांधण्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी भारतीय संघ आणि आयपीएलमधील हैद्राबादचा डेक्कन चार्जेस हे दोन्ही संघ सामने जिंकत नव्हते. घरच्या संघासाठी हे मैदान अशुभ ठरत होते. या मैदानाच्या वास्तुमध्ये चुक असल्याचे सांगितले जात होते. गणपतीला वास्तुशास्त्राची देवता मानतात. त्यामुळे तेथे गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे.” असे मंदिराचे पुजारी हनुमंत शर्मा यांनी सांगितले.
विशेष म्हणजे 2011 पासून या मैदानावर भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.
“या मंदिरात एकदा महेंद्रसिंग धोनी आणि करन शर्मा हे दोन्ही खेळाडू आल्याचे आपल्याला आठवते.” असेही हनुमंत शर्मांनी सांगितले.
https://twitter.com/SumesaraAnkit/status/1050680626414727168
हनुमंत शर्मा हे येथील पुजारी असून ते तेलगू चित्रपटात काम देखील करतात.
२०११ पासून भारतीय संघ या मैदानावर ५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात भारताने सर्व ५ सामने जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का
- वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी
- आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे