---Advertisement---

मोठी बातमी। न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक अन् ‘हा’ खेळाडू संघातून होणार बाहेर! मग कुणाला मिळणार संधी?

On: शनिवार, ऑक्टोबर 21, 2023 4:22 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत विजयी ‘चौकार’ पूर्ण केला आहे. आता संघ विजयाचा ‘पंच’ मारण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) विश्वचषकातील 21वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे.

वृत्तांनुसार, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले जाऊ शकते.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1715675598247559424

विशेष म्हणजे, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही सामन्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने शमी आणि सूर्याला संघात घेण्याचा सल्ला दिला आहे. हरभजननुसार, पंड्याच्या अनुपस्थितीत या दोघांना खेळवले पाहिजे.

काय म्हणाला हरभजन सिंग?
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या मते, पंड्याच्या अनुपस्थितीत शमी आणि सूर्या यांना संधी दिली पाहिजे. त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जर हार्दिक पंड्या फिट नसला, तर ही चिंतेची बाब आहे. तो आपल्यासाठी संयोजन बसवतो. तो जर खेळला नाही, तर यात बदल करावा लागेल. तुम्ही एक तर इशान किशन किंवा सूर्यकुमार यादवला पूर्ण वेळ फलंदाज म्हणून खेळवू शकता. आपण शार्दुल ठाकूर याला खेळवत आहोत. कारण, तो एक अष्टपैलू आहे. मला वाटते की, तुम्ही मोहम्मद शमी यालाही संघात घेतले पाहिजे. कारण, तो संपूर्ण 10 षटके गोलंदाीज करू शकतो.”

पंड्याला काय झालं?
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. पंड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. पंड्या आपल्या पहिल्याच षटकादरम्यान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात घसरला होता. त्यामुळे त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. स्कॅननंतर पंड्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो भारतीय संघासोबत धरमशाला येथे गेला नाहीये. तो थेट संघासोबत लखनऊ येथे जोडला जाईल. या ठिकाणी भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. (this two indian cricketer likely to replace Hardik pandya & shardul Thakur for the New Zealand match)

हेही वाचा-
‘मी पाकिस्तान झिंदाबाद बोलणार…’, बंगळुरूत पोलीस अन् चाहत्यामध्ये राडा- व्हिडिओ तुफान व्हायरल
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! कॅप्टन बावुमा संघातून बाहेर, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---