महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि. 16 जून) दोन सामन्याने स्पर्धेतील रंगत वाढणार आहे. एमसीएच्या गहुंजे येथील मैदानावर दुपारी 2 वाजता नाशिक ईगल टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स असा सामना रंगेल, तर रात्री आठ वाजता रत्नागिरी जेटस विरुद्ध सोलापूर रॉयल्स असा सामना होईल. चारही संघ आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या पुढील प्रवासासाठी आत्मविश्वास मिळविण्यासाठी उत्सुक राहणार असल्यामुळे दोन्ही सामने रंगतदार होतील याच शंकाच नाही.
आक्रमक त्रिपाठी विरुद्ध वेगवान राजवर्धन
पहिल्या सामन्यात आयपीएलचा अनुभव गाठिशी असलेल्या राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) यांच्यातील लढत रोमांचक ठरले. त्रिपाठी नाशिक, तर हंगरगेकर छत्रपती संभाजीनगर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. भारताकडूनही खेळण्याचा अनुभव असलेल्या राहुल त्रिपाठीला या वेळी हर्षद खडीवाले, सिद्धेश वीर, कोशल तांबे आणि यष्टिरक्षक मंदार भंडारी यांची साथ मिळेल.
नाशिकची गोलंदाजीची मदार महाराष्ट्राचा वेगवान गोलंदार आशय पालकर, चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ताफ्यातील लेगस्पिनर प्रशांत सोळंकी यांच्यावर असेल. प्रशांत लिलावाच्या अगदी ऐनवेळी मुंबईहून महाराष्ट्राच्या ताफ्यात दाखल झाला होता.
भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक आणि आयपीएल विजेत्या चेन्नई संघाची हंगरगेकरच्या गोलंदाजीने यापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला रामेश्वर दौड आणि मोहसिन सय्यदची साथ मिळेल. डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीश झोपे, ऑफस्पिनर शमसुझमा काझी यांचे पर्याय त्यांच्याकडे असतील. मुर्तझा ट्रंकवाला, ओम भोसले, रणजीत निकम, हर्षल काटे, सौरभ नवले ही त्यांची फलंदाजीची ताकद असेल.
जेट्स विरुद्ध रॉयल्स
अझीम काझी (Azim Kazi) याच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी जेटस संघ सत्यजित बच्छावच्या सोलापूर रॉयल्सशी दोन हात करेल. सातत्यपूर्ण फलंदाजी आणि उपयुक्त डावखुरी फिरकी गोलंदाजी अशी अष्टपैलू गुणवत्ता ही अझीमची ताकद असून, त्याच्या अष्टपैलू कामगिरीवर खूप काही अवलंबून असेल. निखिल नाईकसारखा आक्रमक फलंदाज त्यांच्याकडे आहे. दिव्यांग हिंगणेकर हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू रत्नागिरीची ताकद वाढवतो.
रणजीपटू प्रदीप दाढे, निकित धुमाळ हे वेगवान गोलंदाज आणि किरण चोरमले, धीरज फटांगरे, अशकरण काझी, विजय पावले हे उदयोन्मुख खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज आहेत.
सोलापूर संघाने 19 वर्षाखालील भारतीय संघातील विकी ओस्तवालला आयकॉन प्लेअर ठरवले असले, तरी रणजीतील यशस्वी फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav) सोलापूरचा कर्णधार आहे. या दोघांच्या कामगिरीवर सोलापूरच्या आशा केंद्रित असलतील. प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, हर्षवर्धन टिंगरे असे सोलापूर संघातील गोलंदाजीचे पर्याय असतील. फलंदाजीत यश नहार, अथर्व काळे, स्वप्नील फुलपगार यष्टिरक्षक विशांत मोरे यांच्यावर सोलापूर संघाची मदार राहील. (this two matches will be held in mpl 2023 tournament 2nd day)
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजचे पाय धरण्यासाठी दोन चाहते मैदानात, सुरक्षारक्षकांनाही पळवलं, पाहा MPL मधील मजेदार व्हिडिओ
MPL 2023: उद्घाटनाच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा दणदणीत विजय, ऋतुराजचे वादळी अर्धशतक, कोल्हापूर पराभूत