भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित कसोटी मालिका बुधवार (४ ऑगस्ट) पासून सुरू होणार आहे. मालिकेचा पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये होणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेबद्दल बरीच चर्चा आहे. भारतीय संघाला येथे मालिका जिंकण्यासाठी दावेदार मानले जात आहे. या संपूर्ण मालिकेदरम्यान भारतात प्रसारित होणाऱ्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना हिंदी आणि इंग्रजी, या दोन्ही भाषेत ऐकता येईल. या मालिकेपूर्वी कॉमेंट्री पॅनलमधील सर्व दिग्गजांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सोनी स्पोर्ट्सने भारतात मालिका थेट प्रसारित करण्याचे अधिकार मिळवले आहेत.
भारतीय संघ बुधवार (४ ऑगस्ट)पासून ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेदरम्यान प्रेक्षकांचा उत्साह सातव्या आकाशावर असणे अपेक्षित आहे. उत्साह वाढवण्यासाठी हिंदी आणि इंग्रजीत कॉमेंट्री पॅनलमध्ये सामील झालेल्या स्टार्सची नावे समोर आली आहेत. ७ माजी दिग्गजांना इंग्रजी भाषेतील पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यापैकी दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंची देखील नावे आहेत.
इंग्लंडचे माजी कर्णधार ॲलिस्टर कुक, नासिर हुसेन आणि माईक ऑर्थटन यांची इंग्रजी समालोचकांमध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर हे देखील या इंग्रजी भाषेतील पॅनेलचा भाग असणार आहेत. क्रिकेट तज्ज्ञ असलेल्या हर्षा भोगले यांनाही पॅनलमध्ये ठेवण्यात आले आहे. हिंदीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात आशिष नेहरा, मोहम्मद कैफ, अजित आगरकर, विवेक राजदान आणि अजय जडेजा यांच्यासह माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा देखील समावेश आहे.
Here's an extraordinary commentary panel for #ExtraaaInnings and the #ENGvIND series 🎙️
It's time to #BackOurBoys for ENGvIND, 5-Match Test series 🇮🇳
🕝 TOM, 2:30 PM
📺 Sony SIX, Sony TEN 3, Sony TEN 4#ENGvsIND #INDvENG #SirfSonyPeDikhega pic.twitter.com/9CBGGSP3bA— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 3, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान नॉटिंघममध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान लॉर्ड्समध्ये खेळला जाईल. यानंतर तिसरा सामना २५ ते २९ ऑगस्टदरम्यान लीड्समध्ये होणार आहे. चौथा सामना २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळला जाईल; तर शेवटचा सामना १९ ते १४ सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शमीकडे कसोटी विकेट्सचा ‘द्विशतकवीर’ बनवण्याची संधी, इंग्लंडचा समाचार घेत साधणार ही किमया
अय्या! ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला आवडते आयपीएलची ‘ही’ टीम; खुद्द अभिनेत्रीनेच केलाय खुलासा
‘थाला’चा सीएसके संघ ‘या’ दिवशी युएईला भरणार उड्डाण, सीईओ विश्वनाथन यांनी दिली माहिती