---Advertisement---

IPL 2025 Retention Rules; रिटेंशन नियमात मोठे बदल, RTM कार्डचाही वापर होणार

On: शनिवार, सप्टेंबर 28, 2024 10:22 PM
ipl auction 2024
---Advertisement---

2024च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) जेतेपद पटकावले. आता चाहते आगामी आयपीएल हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तत्पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत. आगामी मेगा लिलावासंदर्भात रिंटेशनबाबत एक बातमी समोर आली आहे.

स्पोर्ट्स तकच्या (Sports Tak) रिपोर्ट्सनुसार एक संघ जास्तीत जास्त एकूण 5 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतो. मेगा लिलावात एका आरटीएम कार्डचा देखील वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक संघाकडे खेळाडूंनी खरेदी करण्यासाठी 120 कोटी रूपयांची रक्कम असणार आहे, तर खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी 75 कोटी रूपये असणार आहेत. प्रत्येक संघासाठी 5 खेळाडूंना कायम ठेवताना विदेशी, भारतीय खेळाडू किती ठेवायचे? याची मर्यादा नसणार आहे.

संघात खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी रक्कम-

पहिला रिटेंशन- 18 कोटी
दुसरा रिटेंशन- 14 कोटी
तिसरा रिटेंशन- 11 कोटी
चौथा रिटेंशन- 18 कोटी
पाचवा रिटेंशन- 14 कोटी

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाज त्रिफळाचीत होऊनही पंचांनी दिले नाबाद, क्रिकेटच्या नियमामुळे प्रतिस्पर्धी संघाची गोची!
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम
पांड्या कधीही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकणार नाही; भारतीय दिग्गजाचे रोखठोक मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---