भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता. तिथं दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली. टी20 साठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे होती, तर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरला होता. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतानं श्रीलंकेवर 3-0 असा विजय मिळवला. पण एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेनं भारतावर 2-0 असा विजय मिळवला. तत्पूर्वी आगामी चॅम्पियन्स ट्राॅफी होणार आहे आणि त्याआधीच भारताची सुरुवात खराब झाली.
अशा स्थितीत, भारतीय संघाकडे चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी तयारीसाठी किती एकदिवसीय सामने आहेत हे आपण या बातमीद्वारे जाणून घेणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी तयारीसाठी भारतीय संघ केवळ 3 एकदिवसीय सामने खेळू शकणार आहे. भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला तयारीला अंतिम स्वरूप देण्याची शेवटची संधी असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेचा विचार करता भारताकडे तयारीसाठी पुरेशा संधी नाहीत. पण भारतीय संघ जे काही सामने असतील त्यात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर श्रीलंकेनं 2-0 अशी आघाडी मिळवून माालिका आपल्या नावावर केली. तत्पूर्वी दोन्ही संघांमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती आणि तो सामना टाय झाला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारतावर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवून भारताला पराभूत केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
6 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळाल्यास या 3 फ्रँचायझींना होईल सर्वाधिक फायदा
मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया करणार विशेष सराव
मेगा लिलावापूर्वी एक संघ इतक्या खेळाडूंना रिटेन करू शकेल! समोर आलं मोठं अपडेट