---Advertisement---

स्वतःशीस स्पर्धा करतोय फाफ डू प्लेसिस! हंगामात 650 धावा पूर्ण, नावावर केला नवा विक्रम

On: गुरूवार, मे 18, 2023 10:17 PM
Faf Du Plessis
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस याच्यासाठी अप्रतिम ठरली. डू प्लेसिस मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये आपले सर्वोत्तम प्रदर्शन करताना दिसला आहे. पण यावेळी त्याने सर्व सीमा पार केल्या आहेत. गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने आपला स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

आयपीएल 2021 हगामात फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis ) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार बनला. नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली होती. फाफने मात्र आरसीबीच्या कर्णधारपदा परिणाम आपल्या प्रदर्शनावर होऊ दिला नाही. मागच्या वर्षीप्राणे यावर्षीही तो आरसीबीचे नेतृत्व करत आहे आणि धावांचा अक्षरशः पाऊस पाडत आहे. चालू हंगामात त्याने 650* धावांचा टप्पा पार केला आहे. फाफसाठी धावांच्या बाबतीत हा त्याचा सर्वोत्तम आयपीएल हंगाम ठरला आहे.

यापूर्वी आयपीएल 2021मध्ये डू प्लेसिसने 633 धावा केल्या होत्या आणि हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम आयपीएल हंगाम होता. मात्र, यावर्षी त्याने स्वतःचाच हा विक्रम मोडीत काढला. गुरुवारी डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीला जोरदार सुरुवात मिळवून दिली. सलामीवीर जोडीने पावर प्लेच्या सहा षटकांमध्ये 64 धावा साराकल्या.

धावांच्या बाबतीत फाफ डू प्लेसिससाठी सर्वोत्तम ठरलेले आयपीएल हंगाम
648* – 2023
633 – 2021
468 – 2022
449 – 2020
398 – 2012

आरसीबीसाठी हैदराबादविरुद्धचा हा सामना ‘करो या मरो’ ठरला. कारण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लीग स्टेजचे शेवटचे दोन्ही सामना जिंकणे गरजेचे होते. हैदराबादने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 186 धावा केल्या आणि आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले. (This year’s IPL has been the best for Faf du Plessis in terms of runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
’18 नंबरची जर्सी माझी चॉईस नव्हती’, विराटने सांगितलं काय आहे अनोखं कनेक्शन
सनरायझर्स हैदराबादसाठी शतक करणारा चौथा फलंदाज ठरला हेनरिक क्लासेन! अवघ्या 49 चेंडूत केली कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---