ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅब्यूशेनने मागील काही महिन्यांपासून त्याच्या शानदार कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही (Sachin Tendulkar) त्याचे कौतुक केले आहे.
सचिन बुशफायर क्रिकेट बॅश या चॅरिटी सामन्यासाठी रिकी पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक असल्याने सध्या सिडनीमध्ये आहे. यावेळी सचिनला कोणत्या फलंदाजाला पाहून स्वत:ची आठवण होते, असा प्रश्न विचारला. यावर सचिनने लॅब्यूशेनचे नाव घेत म्हटले की त्याचे फूटवर्क चांगले आहे.
सचिन म्हणाला, ‘त्याचे फूटवर्क (पायांच्या हलचाली) अचूक आहे. त्यामुळे मी त्याचे नाव घेईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्सवर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात मी लॅब्यूशेनला खेळताना पाहिले. जखमी स्मिथच्या जागेवर तो खेळला.’
त्यावेळी मी माझ्या सासऱ्यांबरोबर बसलो होतो. मी पाहिले की त्याला जेव्हा जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला आणि त्यानंतरही त्याने 15 मिनिटे फलंदाजी केली. ते पाहून मी म्हटलो तो एक खास फलंदाज वाटत आहे.’
‘फुटवर्क हे मानसिक स्थितीशी संबंधित आहे. कारण जर आपण सकारात्मक दृष्टीकोनातून खेळत नसू तर आपल्या पायाच्या हालचालींवर परिणाम होतो. त्यामुळे मला समजून आले की हा खेळाडू मानसिकदृष्या खूप स्थिर आहे, कारण तसे नसेल तर तूमचे पाय हालत नाही. त्याचे फूटवर्क अद्भूत आहे.’
लॅब्यूशेन हा 2019मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या वर्षात 11 कसोटी सामन्यात 64.94 च्या सरासरीने 1104 धावा केल्या होत्या. तसेच या वर्षाचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणूनही आयसीसीने त्याचा गौरव केला आहे.
पहिल्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंनी केला असा डान्स; पहा व्हिडिओ
वाचा- 👉https://t.co/39dDV2Xdiy👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvBAN— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडिया
वाचा- 👉https://t.co/uNlDHV6UaV👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020