कोलंबोमध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत संघातील टी २० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला. पण या पराभवामुळे श्रीलंकेच्या कर्णधाराचा नकोसा असा विक्रम झाला आहे.
कालच्या सामन्यात दिनेश चंडिमलच्या अनुपस्थित श्रीलंकेचे नेतृत्व थिसारा परेराने केले. पण या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिल्याने श्रीलंकेला परेराच्या नेतृत्वाखाली सलग सातव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विशेष म्हणजे आजपर्यंत परेराने ७ वेळा श्रीलंकेचे कर्णधारपद भूषवले आहे आणि या सर्व सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. त्यामुळे परेराचे नेतृत्वाची सरासरी ० आहे.
श्रीलंकेकडून कर्णधार म्हणून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक विजय कुमार संगकारा आणि दिनेश चंडिमलच्या नावावर आहेत. या दोंघांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने प्रत्येकी १३ वेळा विजय मिळवले आहेत.
हे आहेत श्रीलंकेचे आंतराष्ट्रीय टी २०मधील आजपर्यंतचे कर्णधार:
माहेला जयवर्धने (१२ विजय, ६ पराभव)
तिलत्करने दिलशान (२ विजय, ३ पराभव)
कुमार संगकारा (१३विजय, ९ पराभव)
थिलिना कंदंबी (१ विजय)
अँजेलो मॅथ्यूज (४ विजय, ७ पराभव)
दिनेश चंडिमल (१३ विजय, १३ पराभव)
लसिथ मलिंगा (६ विजय, ३ पराभव)
उपुल थरांगा (३ विजय, ३ पराभव)
थिसारा परेरा (० विजय,७ पराभव)