---Advertisement---

मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’

On: रविवार, मे 15, 2022 4:11 PM
Thomas-Cup-Winner-Indian-Team
---Advertisement---

‘थॉमस कप’ या प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंडोनेशियाला ३-० ने क्लिन स्वीप करत इतिसाहाला गवसणी घातली आहे. ७३ वर्षांमध्ये पहिल्यांदा भारताचे ही अद्वितीय कामगिरी केली आहे.

५ सामन्यांच्या या लढतीत भारताने २ एकेरी आणि १ दुहेरी सामना जिंकला आहे. या दैदिप्यमान यशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

पहिल्या दुहेरी सामन्यात लक्ष्य सेनने एँथोनी सिनिसुकाला ८-२१, २१-१७, २१-१६ ने पराभूत केले होते. दुसऱ्या दुहेरी सामन्यात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने १८-२१, २३-२१, २१-१९ ने विजय मिळवला. तिसरा सामना एकेरी राहिला, ज्यामध्ये किदांबी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीला २१-१५, २३-२१ ने पराभूत केले.

तत्पूर्वी भारतीय संघाने मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या संघांना पराभूत करत पहिल्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात त्यांनी १४ वेळच्या विजेत्या इंडोनेशियाला पराभूत करत भारतीयांची मान जगभर उंचावली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा बिग बॉसमध्ये सायमंड्सने केलेलं प्रपोज, चपाती अन् करी बनवायलाही शिकला होता

खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण

दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! पृथ्वी शॉ रुग्णालयातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---