---Advertisement---

कर्णधारांमुळे खेळाडूंची निराशा! ख्वाजा, सचिनप्रमाणे ‘हा’ खेळाडूही मुकला होता द्विशतकाला

On: शनिवार, जानेवारी 7, 2023 2:09 PM
Usman Khawaja, Sachin Tendulkar & Dravid
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा पुरुष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर (AUSvSA)आला आहे. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत.यातील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (4 जानेवारी) सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी एक विचित्र बाब पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्यासाठी कर्णधार पॅट कमिन्सचा निर्णय नुकसानदायक ठरला. कारण ख्वाजा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या द्विशतकाला मुकला.

झाले असे की, सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ख्वाजा 195 धावा करत नाबाद होता आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. यामुळे चौथ्या दिवशी तो द्विशतक करेल अशी आशा असताना कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव घोषित केला. यामुळे ख्वाजा 195 धावांवर नाबाद राहिला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 4 बाद 475 असा झाला. एखादा खेळाडू द्विशतकाजवळ येऊन त्याच्या कर्णधाराने डाव घोषित करण्याची कसोटीतील ही काही पहिलीच वेळ नाही.

ख्वाजा जसा 195 धावांवर नाबाद राहिला हे पाहूण चाहत्यांना सचिन तेंडुलकर याची आठवण आली. 2004मध्ये भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा मुलतान कसोटीमध्ये राहुल द्रविड याने संघाचे नेतृत्व करताना भारताचा डाव घोषित केला होता. त्यावेळी सचिन 194 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित होता आणि याच सामन्यात विरेंद्र सेहवान याने त्रिशतक झळकावले होते. या प्रकारानंतर सचिनबरोबर चाहतेही नाराज होते. तेव्हा द्रविडवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्या घटनेचा लोक आजही उल्लेख करतात. तो सामना भारताने एक डाव आणि 52 धावांनी जिंकला होता.

सचिनच्या अगोदर वेस्ट इंडिजच्या फ्रँक वॉरेल यांच्याबाबतीतही असेच झाले होते. 1960च्या त्या सामन्यात वॉरेल 197 धावांवर असताना कर्णधार गॅरी अलेक्झांडर यांनी डाव घोषित केला. तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 563 वर 8 विकेट्स अशी होती. इंग्लंड विरुद्धचा तो सामना अनिर्णीत राहिला होता.

या तिघांमध्ये सर्वात वाईट ख्वाजाचे वाटते कारण त्याचे हे पहिलेच द्विशतक होते. तर सचिन आणि वॉरेलचे यांचे द्विशतक मुकण्याआधी कसोटीमध्ये एकदा तर वैयक्तिकपणे 200 धावांचा टप्पा गाठला होता.

कसोटीत जेव्हा फलंदाज 200च्या जवळ असताना कर्णधारने घोषित केला डाव, ते खेळाडू-
197* – फ्रँक वॉरेल 1960 मध्ये (कर्णधार – गॅरी अलेक्झांडर)
195* – उस्मान ख्वाजा 2023 मध्ये (कर्णधार – पॅट कमिन्स)
194* – सचिन तेंडुलकर 2004 मध्ये (कर्णधार – राहुल द्रविड)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvSA: द्रविडच्या 19 वर्षांपूर्वीच्या कृतीची पॅट कमिन्सकडून पुनरावृत्ती! उस्मान ख्वाजाचा ‘स्वप्नभंग’
INDvSL: तिसऱ्या टी20मधून अर्शदीपचा पत्ता कट! कोणाला मिळणार संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---