आयपीएल २०२१ चा १९ वा सामना रविवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात सीएसकेने आरसीबीवर ६९ धावांनी विजय मिळवून पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात सीएसकेच्या रविंद्र जडेजाने एकाच षटकात पाच षटकार ठोकत एका खास यादीत स्थान मिळवले.
एकाच षटकात ठोकले पाच षटकार
सीएसकेच्या डावातील अखेरचे षटक पर्पल कॅप आपल्याकडे राखलेल्या हर्षल पटेलने टाकले. अखेरच्या षटकात फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने षटकाला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक बनवून टाकले. त्याने या षटकात पाच षटकार व एका चौकारासह ३७ धावा फटकावल्या. यासोबत आयपीएलमध्ये एका षटकात ५ षटकार मारणारा तो केवळ तिसरा फलंदाज बनला.
या खेळाडूंनी ठोकलेत आयपीएलमध्ये पाच षटकार
आयपीएलमध्ये सर्वप्रथम एकाच षटकात ५ षटकार ठोकण्याची कामगिरी ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने केली होती. गेलने २०१२ आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाच्या राहुल शर्माला ५ षटकार मारलेले. गेलनंतर अशी कामगिरी २०२० आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाने मारले. शारजाच्या मैदानावर त्याने पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला पाच षटकार खेचण्याची कामगिरी केलेली. त्यानंतर अशी कामगिरी करणारी जडेजा तिसरा फलंदाज बनला.
जडेजाची अविस्मरणीय कामगिरी
आयसीसी विरूद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने अविस्मरणीय कामगिरी केली. फलंदाजी करताना २८ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा त्याने बनवल्या. तर, गोलंदाजी करताना एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल व वॉशिंग्टन सुंदर यांचे बळी त्याने आपल्या नावे केले. डॅनियल ख्रिस्टीयन त्याच्या थेट फेकीवर धावबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगलोरवर सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत चेन्नईने गाठले अव्वल स्थान, ‘या’ संघाची केली बरोबरी
जडेजाच्या वादळी खेळीमुळे एका षटकात ‘अशी’ कामगिरी करणारा चेन्नई ठरला दुसराच संघ