आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आमनेसामने आले होते. दोन्ही संघ यंदा चांगल्या फॉर्मात असल्याने हा मुकाबला रंगतदार होण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र चेन्नईने वर्चस्वपूर्ण खेळ करत या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.
हा चेन्नईचा आयपीएल इतिहासातील बंगलोर वरील १७वा विजय ठरला. यासह आयपीएल मध्ये बंगलोरच्या संघावर सर्वाधिक विजय मिळवलेल्या संघांच्या यादीत चेन्नईने अव्वल स्थानी झेप घेतली.
मुंबईची केली बरोबरी
आजच्या सामन्यात चेन्नईने तिन्ही आघाड्यांवर बंगलोरवर वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात त्यांनी ४ बाद १९१ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करतांना बंगलोरची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. चेन्नईच्या शिस्तबद्ध गोलंदाजी माऱ्यासमोर त्यांना केवळ ९ बाद १२२ धावा करता आल्या. त्यामुळे चेन्नईने ६९ धावांनी सफाईदार विजय मिळविला.
आयपीएल इतिहासातील चेन्नईचा बंगलोरवरील १७वा विजय ठरला. यासह चेन्नईने मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. मुंबई इंडियन्सने देखील बंगलोरवर आयपीएलमध्ये १७ विजय मिळवले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स यात तिसर्या क्रमांकावर असून त्यांनी बंगलोरवर १४ विजय मिळवले आहेत. तर पंजाब किंग्ज १४ विजयांसह चौथ्या स्थानी आहे.
आयपीएल इतिहासात बंगलोरवर सर्वाधिक विजय –
१) चेन्नई सुपर किंग्ज – १७*
२) मुंबई इंडियन्स – १७
३) कोलकाता नाईट रायडर्स – १४
४) पंजाब किंग्ज – १४
जडेजाची अष्टपैलू कामगिरी
या सामन्यात चेन्नईकडून रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केली. त्याने अष्टपैलू खेळ करतांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही योगदान दिले. फलंदाजीत त्याने २८ चेंडूत ६२ धावा केल्या. तर गोलंदाजीत अवघ्या १३ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय त्याने एक लाजवाब रन आउट देखील केला. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराचा तो मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजाच्या वादळी खेळीमुळे एका षटकात ‘अशी’ कामगिरी करणारा चेन्नई ठरला दुसराच संघ
जडेजा समोर थंडावते आहे ‘या’ स्फोटक फलंदाजाची बॅट, तब्बल पाच वेळा झालाय बाद
CSK vs RCB : जडेजा पडला आख्ख्या आरसीबी संघावर भारी! चेन्नईचा बेंगलोरवर ६९ धावांनी दमदार विजय






