अनेकांच्या मते टी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे वनडे आणि कसोटीपेक्षाही कठीण आहे. कारण फलंदाज या फॉरमॅटमध्ये आक्रमक भूमिकेत असतात आणि अनेकदा गोलंदाजांची धुलाई होते. असे असले तरी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये अनेकदा गोलंदाजांना पाच विकेट्सचा हॉल नावावर केला आहे. असेही काही गोलंदाज आहेत, ज्यांनी आयपीएल सामन्याच्या एका इनिंगमध्ये सहा विकेट्स घेतल्या होत्या. आपण या लेखात अशाच तीन गोलंदाजांचा विचार करणार आहोत, ज्यांनी एका डावात सहा इनिंग्ज घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत एकही भारतीय गोलंदाज नाहीये.
आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 गोलंदाज असे होऊन गेले, ज्यांनी एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. या भारतीय गोलंदाज देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र तीन असे गोलंदाज आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये एका डावात सहा विकेट्स घेतल्या आहेत. हे तिन्ही गोलंदाज विदेशी असल्यामुळे ही कामगिरी खरोखर महत्वाची राहिली आहे.
आयपीएलमध्ये एका डावात 6 विकेट्स घेणारे तीन गोलंदाज
आयपीएलमध्ये एका सामन्यात 6 विकेट्स गेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिले नाव पाकिस्तानच्या सोहेल तनवीर (Sohail Tanveer) याचे येते. सोहेलने आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 साली हा कारनामा केला होता. तनवीर याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केले होती. पार्थिव पटेल, स्टीफन फ्लेमिंग, विद्युत शिवाकृष्णन, एल बी मॉर्कल, मुथैय्या मुरलीधरन आणि मखाया नितिश हे सोहेलच्या गोलंदाजीचे शिकार बनले होते. आयपीएल 2008 नंतर सोहेल तनवीर आयपीएल खेळू शकला नाही. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला आणि पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्यावर भारताकडून बंदी आणली गेली.
आयपीएलमध्ये 6 विकेट्श घेणारा दुसरा गोलंदाज ऍडम झंपा (Adam Zampa) आहे. झंपाने आयपीएल 2016 मध्ये पुणे सुपरजायंट्स संघासाठी 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध युवराज सिंग, मोइजेस हेनरिक्स, दीपक हुडा, नमन ओझा आणि भुनवेश्वर कुमार यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.
यादीत तिसरा गोलंदाज आहे वेस्ट इंडीजचा अल्जारी जोसेफ (Aljari Joseph) आहे. जोसेफने आयपीएल 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात त्याने दीपक हुड्डा, विजय शंकर, डेविड वॉर्नर, राशिद खान, सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमार यांना तंबूत धाडले होते. अल्जारी जोसेफ अशी कामगिरी करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली होती. (Three bowlers to take 6 wickets in an innings in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! रिंकूकडून 5 षटकार खाणारा गुजरातचा खेळाडू आजारी, 8 किलो वजनही उतरलं; पंड्याचा मोठा खुलासा
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय