---Advertisement---

पुनरागमन अशक्य! असे ३ क्रिकेटपटू, ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची झाली बंद

On: शनिवार, मे 29, 2021 9:08 AM
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेटपटूचे एक स्वप्न असते की, आपण मोठे झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या कित्येक वर्षात खूप खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केले आहे. मात्र पदार्पण केलेल्या खेळाडूंची कामगिरी यशस्वी ठरेलच असे नाही. खूप खेळाडूंना पदार्पणाची संधी तर मिळते परंतु काही सामन्यांतील खराब प्रदर्शनामुळे त्यांना संघातून बाहेर काढले जाते. यावेळी त्यांच्याजागी खेळणारे पर्यायी खेळाडू दमदार कामगिरी करत त्यांचे स्थान पक्के करुन घेतात. यामुळे संघाबाहेर करण्यात आलेल्या बऱ्याचशा खेळाडूंना पुनरागमनासाठी संघर्ष करावा लागतो.

आजच्या लेखात आपण अशा भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना काही कारणास्तव बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर आता त्यांना भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे कठीण झाले आहे.

३. परवेज रसूल
जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू परवेज रसूल याने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली होती. रसूलच्या घरगुती सामन्यांतील दमदार प्रदर्शनाच्या बळावर २०१३ मध्ये झिम्बावेविरुद्ध संघात स्थान मिळवायची संधी मिळाली. परंतु तेव्हा त्याला पदार्पण करता आले नाही. नंतर काही कालांतराने त्याला बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण करायची संधी मिळाली. यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने २ बळी घेतले. तरीही रसूलला पुढच्या सामन्यासाठी बाहेर करण्यात आले.

त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा इंग्लंड विरुद्ध टी२० सामन्यात त्याला संधी देण्यात आली. त्या सामन्यात त्याने १ बळी आणि ५ धावांची कामगिरी केली. रसूलला त्यानंतर कधीही भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तसेच आईपीएलमध्येही त्याच्यावर कोणी बोली लावत नाही. त्यामुळे रसूलला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणे जवळ जवळ अशक्य झाले आहे.

२. राहुल शर्मा
२०११च्या आईपीएलमध्ये आपल्या अचूक टप्याने गोलंदाजी करणारा राहुल शर्मा याने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने त्याच्या भेदक गोलंदाजीचा बळावर त्याचवर्षी भारतीय संघात स्थान मिळवले. इंग्लंडविरुद्ध संघात स्थान मिळवल्यानंतरही त्याला पदार्पण करण्याची संधी नाही मिळाली. त्यानंतर २०११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर राहूलने कारकिर्दीत ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ६ बळी घेतले आहेत. याव्यतिरिक्त राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० पदार्पण करून दोन टी२० सामने खेळले आहेत.

मात्र खूप वर्षे झाली राहुल आता भारतीय संघ दूरच आईपीएलमध्येही खेळताना दिसत नाही. तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय संघात आता लेग स्पिनर्सच्या रुपात युझवेंद्र चहल आणि राहुल चाहर आहेत. त्यामुळे राहुल शर्माचे भारतीय संघात पुन्हा आगमन होणे जवळपास अश्यक्य आहे.

१. वरून एरॉन
वरून एरॉनने भारतीय संघासाठी एकदिवसीय तसेच कसोटी दोन्ही क्रिकेट खेळले आहे. परंतु या गोलंदाजाने सुरुवातीच्या काळात प्रभावी असे प्रदर्शन नाही केले आणि याच कारणामुळे तो नेहमीच संघातून आत-बाहेर होत राहिला. वरूनकडे जलद गतीने गोलंदाजी करण्याचे कौशल्य होते. परंतु त्यला आपल्या गोलंदाजीवर कधीही नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तो दिशाहीन गोलंदाजी करून खूप धावा खर्च करत असे.

वरूनने ९ कसोटी सामन्यात १८ बळी घेतले आहेत आणि ९ एकदिवसीय सामन्यात ११ बळी घेतले आहेत. वरूनने भारतासाठी शेवटचा सामना २०१५ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याचे कधीही भारतीय संघात पुन्हा आगमन झाले नाही. सध्या भारताकडे भेदक असे गोलंदाज आहेत. त्यामुळे वरूनचे भारतीय संघात परत स्थान मिळवणे खूप कठीण आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टॉप-३ संघ, ज्यांच्यावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ओढावली पराभवाची नामुष्की; भारत ‘या’ स्थानी

श्रीलंका दौऱ्यावर असणार भारताचं वर्चस्व, ‘ही’ आहेत त्यामागची समर्पक कारणे

ENGvIND: १० सामन्यात ७२७ धावा करणारा ‘हा’ फलंदाज कसोटी मालिकेत चोपणार सर्वाधिक धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---