१७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. तसेच यानंतर उभय सामन्यांमध्ये कसोटी मालिका देखील खेळली जाणार आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातील खेळाडू बायो बबलमध्ये आहेत. आता याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकांमध्ये भारताच्या बऱ्याच खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळाली आहे.
अजिंक्य रहाणेला पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. तसेच श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी दिली गेली आहे. असे असले तरी या सामन्यात संधी मिळालेल्या युवा खेळाडूंपैकी रोहित शर्माची जागा कोणता खेळाडू घेणार हे अद्याप स्पष्ट आलेले नाही. या लेखात अपण भारतीय संघातील अशा तीन खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात करू शकतात.
हे तीन खेळाडू करू शकतात रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात
१. शुभमन गिल
शुभमन गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. कसोटी कारकिर्दीत त्याने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत आणि ४१४ धावा केल्या आहेत.
त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या सामन्यांमध्ये तीन अर्धशतके ठोकली आहेत. त्याला रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूसोबत फलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच तो रोहितच्या अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो.
२. केएल राहुल
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या उत्कृष्ट सलामीवीर जोड्यांपैकी एक आहे रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची जोडी. रोहित पहिल्या कसोटीसाठी विश्रांतीवर असला तरी केएल राहुल मात्र या सामन्यात खेळणार आहे. राहुल रोहितची कमतरता भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि तो संघाला एक चांगली सुरुवात देऊ शकतो.
त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतक आणि १२ अर्धशतक केले आहेत. राहुलने यापूर्वी अनेकदा कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. अशात तो न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात मयंक अग्रवालची उत्तम प्रकारे साथ दोऊ शकतो.
३. रिद्धिमान साहा
रिद्धिमान साहाने त्याच्या कारकिर्दीत एकूण ३८ कसोटी सामने खेळले आहेत आणि न्यूजीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात तो रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. यापूर्वी त्याला आयपीलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडताता पाहिले गेले आहे. रिद्धिमान साहाला शक्यतो संघाच्या मधल्या फळीत खेळताना पाहिले गेले आहे. पण आवश्यकता भासल्यावर तो डावाची सुरुवातही करू शकतो. कसोटी कारकिर्दीत त्याने आतापर्यंत तीन शतक आणि पाच अर्धशतक ठोकले आहेत. भारतीय संघासाठी त्याने नेहमीच फायदेशीर ठरणारी खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमधील स्कूप शॉट पुन्हा टीव्हीवर पाहून मिस्बाह उल हकने दिली ‘अशी’ रिऍक्शन
भारत-न्यूझीलंड संघ टी२० मालिकेसाठी सज्ज; ‘अशी’ राहिलीये दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी
‘ही २००७ ची गोष्ट आहे…’, रोहितने द्रविडच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या पदार्पणाच्या आठवणींना दिला उजाळा