कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात सध्या ३सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर मंगळवारी (२७ जुलै) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंका संघात तणावाचे वातावरण आहे. त्यांचे ३ खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे दुसऱ्या टी२० सामन्यात त्यांच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे.
तीन खेळाडू दुखापतग्रस्त
श्रीलंका संघातील चरिथ असलंका, भानुका राजपक्ष आणि पाथम निसानक हे तीन खेळाडू सध्या दुखापतींचा सामना करत आहेत. असलंका सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ३ सामन्यांत श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने १२७ धावा केल्या होत्या.
तसेच त्याने पहिल्या टी२० सामन्यांत श्रीलंकेकडून २६ चेंडूत सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो जर दुसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर गेला, तर श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. त्याला रविवारी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
तसेच भानुका यापूर्वीच टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला शुक्रवारी (२३ जुलै) झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याचा चेंडू बोटाला लागला होता. त्यामुळे तो पहिला टी२० सामनाही खेळू शकला नव्हता. तसेच आता तो संपूर्ण टी२० मालिकेतूनच बाहेर पडल्याचे समजत आहे. याशिवाय पाथमला रविवारी नेट सेशनमध्ये हाताला चेंडू लागला आहे. त्याच्या स्कॅनचे रिपोर्ट येणे अजून बाकी असले, तरी तो देखील दुसऱ्या टी२० सामन्याला मुकण्याचीच शक्यता अधिक आहे.
श्रीलंका संघ करतोय संघर्ष
सध्या श्रीलंका संघ विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना भारताविरुद्ध वनडे मालिकेतही १-२ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टी२० मालिकेतही पहिला सामना भारताने जिंकल्याने श्रीलंका ०-१ अशा फरकाने पिछाडीवर आहे. आशा परिस्थितीत खेळाडूंच्या दुखापतींनी त्यांच्या संघातील तणाव अधिक वाढवला आहे.
श्रीलंका संघव्यवस्थापन कोविड-१९ नियमानुसार तयार ठेवण्यात आलेल्या पर्यायी संघातील काही खेळाडूंना भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बदली खेळाडू म्हणून बोलावून घेण्याची शक्यता आहे. (three players of Sri Lanka likely to miss second T20I against India due to injury)
श्रीलंकेसाठी दुसरा टी२० सामना ‘करो किंवा मरो’ या स्थितीतील आहे. त्यामुळे ते हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूनेच मंगळवारी मैदानात उतरतील. तर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका खिशात खालण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
टोकियो ऑलिंपिक: ‘असे’ आहे भारताचे ५ व्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक; पाहा कोणते खेळाडू उरणार मैदानात