आयपीएल 2021 मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरूद्धच्या सलामी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाही आपल्या आयपीएल सत्राची सुरूवात पराभवानेच करावी लागली. या सामन्यात दोन्ही संघ संघर्ष करताना दिसले. परंतु शेवटच्या चेंडूवर आरसीबीने 2 विकेट्सने विजय मिळवत हा सामना आपल्या खिशात घातला.
मुंबई संघात जागतिक क्रिकेटमधील काही बड्या खेळाडूंची नावे असूनही संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. जवळजवळ गेली सात वर्षे मुंबईचा संघ आपला पहिला आयपीएलमधील सामना गमावत आहे, त्यामुळे यंदाही मुंबईचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. या संघाची सुरूवातही चांगली झाली होती, परंतु त्यातील काही प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या संघाला सामना गमावावा लागला. त्यातील काही प्रमुख कारणे पाहूया…
– मुंबईचा संघ काहीकाळ चांगल्या स्थितीत होता. त्यांचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लिनही जोरदार फटकेबाजी करत होता. त्यामुळे संघाकडून मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा होती. परंतु ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड या मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे 180 धावांच्या दिशेने जाणारी मुंबईची गाडी 159 धावांवरच अडखळली.
– दुसरे कारण म्हणजे या सामन्यात आरसीबीकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलने या डावांत पुनरागमन केले. त्याने वेगवान गोलंदाजीमध्ये मिश्रण करताना धावांवर अंकुश लावत महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्यामध्ये शेवटच्या षटकांत त्याने फक्त 1 धाव देऊन 3 बळी घेतले. आणि हाच या सामन्यातील कलाटणी देणारा क्षण ठरला. या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सचे 5 फलंदाज बाद केले. त्याची हीच गोलंदाजी मुंबईच्या पराभवाचे प्रमुख कारण बनली.
– तिसरे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आरसीबीचा संघ थोडासा अडचणीत यायचा किंवा धावगती कमी दिसायची, त्यावेळेस मुंबईचा गोलंदाज राहुल चाहरने जास्त धावा खर्च केल्या. त्याची ही गोलंदाजी एक मुंबईच्या पराभवाची प्रमुख कारण बनली. इतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु राहुलच्या या चार षटकांमध्ये आरसीबी फलंदाजांनी 43 धावांचा रतीब घातला. मुंबई संघातील गोलंदाजांपैकी सर्वाधिक धावा त्यानेच खर्च केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
जबराट! चक्क हातावर आरती ठेवत चाहत्याने केली विराटची पुजा, पाहा झक्कास व्हिडिओ
फॅन असावा तर असा! बेंगलोरविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या रोहितची चाहत्याने केली आरती, पाहा भारी व्हिडिओ
‘हिटमॅन’ची मुंबई इंडियन्स परिवारासोबतची १० वर्षे पूर्ण, फ्रँचायझीने शेअर केला खास व्हिडिओ; पाहा