---Advertisement---

काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती

On: शुक्रवार, जून 10, 2022 9:09 AM
Cricket Ground
---Advertisement---

तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या- कृणाल पंड्या, इरफान पठाण – युसुफ पठाण आणि स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ या भावांच्या जोडीला एकाच सामन्यात खेळताना पाहिलं आहे. परंतु असा सामना कधी पहिला आहे का, ज्या सामन्यात तब्बल ६ भाऊ एकाच सामन्यात खेळले होते. या गोष्टीवर तुमचा विश्वास पटणार नाही. परंतु असे झाले आहे. हा सामना झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये १९९७ -९८ दरम्यान हरारेच्या मैदानावर खेळला गेला होता. याच भावांपैकी एक भाऊ म्हणजे ब्रायन स्ट्राँग याचा काल वाढदिवस होता. ब्रायनचा जन्म ९ जून १९७२ मध्ये झाला होता.

या सामन्यात, अँडी फ्लॉवर आणि ग्रँट फ्लॉवर, ब्रायन स्‍ट्राँग आणि पॉल स्‍ट्राँग, गेविन रेनी आणि जॉन रेनी या तीन भावांच्या जोड्या खेळल्या होत्या. हे सर्व खेळाडू झिम्बाब्वे संघाकडून खेळले होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २९४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला ४४.१ षटकात २११ धावा करण्यात यश आले होते. तसेच झिम्बाब्वे संघाला या सामन्यात ८३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

ब्रायन स्ट्राँगने या सामन्यात १० षटक गोलंदाजी करून ६६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. यासोबतच त्याने फलंदाजी करत असताना १५ धावांचे योगदान दिले होते. तसेच त्याचा भाऊ पॉल स्ट्राँग याने फलंदाजी करताना २७ धावा केल्या होत्या. तर १० षटक गोलंदाजी करत त्याने ५८ धावा खर्च केल्या होत्या.

अँडी फ्लॉवरने कुठल्या होत्या सर्वाधिक धावा. 

तसेच जॉन रेनीने १० षटक गोलंदाजी करत ५४ धावा खर्च केल्या होत्या. यात त्याला १ गडी बाद करण्यात यश आले होते. यासोबतच त्याचा भाऊ गोविन रेनी याने फलंदाजी करताना १७ धावांचे योगदान दिले. तसेच फ्लॉवर बंधूंनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. अँडी फ्लॉवरने या सामन्यात फलंदाजी करताना ४४ धावा केल्या होत्या. तर ग्रँट फ्लॉवरने २४ धावांचे योगदान दिले होते. तसेच ग्रँटने गोलंदाजी करताना ५ षटकात २४ धावा खर्च करत १ गाडी बाद केला होता.

बर्थडे बॉय ब्रायन स्ट्राँग याने झिम्बाब्वे संघासाठी एकूण २६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ५६ गाडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच ४९ वनडे सामन्यात त्याने ४६ गडी बाद केले आहेत. याव्यतिरिक्त ब्रायनने ७४ प्रथम श्रेणी सामन्यात २५२ गडी बाद केले होते. यासोबतच ७८ लिस्ट ए सामन्यात त्याने ८१ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

मिलर-दुसेन जोडीकडून धावांचा मारा, भारतीय संघापुढे भारतातच रचली सर्वात मोठी भागीदारी

कर्णधार रोहितविना बिघडतंय टीम इंडियाचं गणित? पाहावे लागलेत सलग ‘इतके’ पराभव

दक्षिण आफ्रिकेचा एक विजय टीम इंडियाला पडला महागात! धुळीस मिळालं इतिहास रचण्याचं स्वप्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---