क्रिकेट खेळाचं स्वरूप जस जस बदलत गेलं तस क्रिकेटमध्ये आक्रमकता येत गेली. एकदिवसीय सामने आणि आता टी२० क्रिकेटमध्ये आपल्याला अक्षरशः चौकार आणी षटकारांचा पाऊस पडताना दिसतो.
सौरव गांगुली, क्रिस गेल, एबी डिव्हिलिर्स, हार्दिक पंड्या ही काही नाव जी ह्यांच्या आक्रमक खेळासोबतच त्यांचा षटकारांसाठी ओळखली जातात. अशाच प्रकारे आज आपण पाहणार आहोत विश्वचषकातील तीन षटकार जे भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत.
२००३ विश्वचषक – भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत २००३ चा विश्वचषक आपल्या नावावर करू शकला नाही, मात्र या विश्वचषकातील काही आठवणी आजही आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात जस की आशिष नेहराचा इंग्लंड विरुद्धचा २३/६ जबरदस्त स्पेल, सेहवागची फायनलमधील एकाकी झुंज, अशाच प्रकारे आणखीन एका गोष्टीसाठी हा विश्वचषक आपल्या कायम स्मरणात राहतो ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यासाठी.
या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा चारीमुंड्या चित करत पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 273 धावांचे लक्ष दिले होते. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग ही सलामीची जोडी मैदानात होती, पाकिस्तानकडे त्यावेळचे सर्वोत्तम वेगवान गोलंदाज त्यांच्या संघात होते. वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर या पाकिस्तानी त्रिकुटाचा सामना सचिन आणि सेहवागने जोरदार फटकेबाजी करत केला होता.
शोएब अख्तरच्या पहिल्याच षटकामध्ये सचिन तेंडुलकरने पॉंईटच्यावरून मारलेला तो षटकार आजही प्रेत्येक भारतीयाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. या षटकामध्ये तब्बल १७ धावा कुटत सचिन-सेहवागने पाकिस्तानी गोलंदाजीचे कंबरडे मोडले होते
२००७ टी२० विश्वचषक – भारत विरुद्ध इंग्लंड
साल २००७ ला पहिला टी२० विश्वचषक दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजीत केला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात साखळी फेरीचा सामना झाला होता, या सामन्यात युवराज सिंगने केलेला पराक्रम असामान्य होता सहा चेंडूंमध्ये सहा षटकारांचा पराक्रम करणारा टी२० इतिहासातील तो पहिला खेळाडू ठरला, तसेच युवराजने या सामन्यात १२ चेंडूत ५० धावा करून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
१९ व्या षटकाच्या आगोदर फ्लिंटॉफ आणि युवराज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचे एवढे गंभीर परिणाम इंग्लिश संघास भोगावे लागतील, असे कुणालाच वाटले नव्हते. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीजीच्या चिंधड्या उडवत युवराज सिंगने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ६ चेंडूत ६ षटकार मारले होते, जे आजही आपणास आठवतात. हा सामना भारतीय संघाने १८ धावांनी जिंकला. तसेच या सामन्यात सामनावीराचा किताब युवराजने आपल्या नावावर केला होता.
२०११ विश्वचषक – अंतिम सामना.
साल २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना आणि भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मारलेला षटकार भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला. सचिन तेंडुलकरच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचे दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. तब्बल २८ वर्षांनी भारतीय संघाने वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
श्रीलंकेने दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना स्वतःला बढती देत महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदास साजेशी खेळी करत ७९ चेंडूत नाबाद ९१ धावा केल्या होत्या व भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम षटकारांपैकी हा एक षटकार मानला जातो.
आपण भारतीय क्रिकेट इतिहासातील तीन सर्वोत्तम षटकार पहिले, एक विशेष बाबम्हणजे या तिन्ही षट्कारांच्यावेळी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समालोचन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘हे’ ३ भारतीय खेळाडू भरुन काढतील सलामीवीर रोहित शर्माची कमतरता
टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमधील स्कूप शॉट पुन्हा टीव्हीवर पाहून मिस्बाह उल हकने दिली ‘अशी’ रिऍक्शन
भारत-न्यूझीलंड संघ टी२० मालिकेसाठी सज्ज; ‘अशी’ राहिलीये दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी