क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये 3 दिग्गजांचा समावेश झाला आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश आहे. त्याच्याव्यतिरिक्त भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी आणि श्रीलंकेचे माजी महान खेळाडू अरविंद डी सिल्वा यांना आयसीसीने सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे, भारताचे अनेक खेळाडू आधीपासूनच आयसीसी हॉल ऑफ फेमचा भाग आहेत. त्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CzkvQltPx1a/?igshid=MWFta2xidnpvcm9xaw%3D%3D
माजी खेळाडूंचा 7 वर्षांनी होतो सन्मान
आयसीसीने सोमवारी (दि. 13 नोव्हेंबर) आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील केलेल्या 3 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. यामध्ये दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), भारताच्या माजी क्रिकेटपटू डायना एडुलजी (Diana Edulji) आणि श्रीलंकेचे दिग्गज अरविंद डी सिल्वा (Arvinda De Silva) यांचा समावेश आहे. आयसीसीचा नियम आहे की, निवृत्तीच्या जवळपास 7 वर्षांनंतरच कोणत्याही माजी क्रिकेटपटूचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. त्यामुळेच सेहवागही उशीरा या यादीत सामील झाला आहे.
एडुलजी पहिल्या भारतीय महिला
भारताकडून 54 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या डायना एडुलजी या देशाच्या पहिल्याच महिला खेळाडू बनल्या, ज्यांना आयसीसीकडून हा सन्मान मिळाला. एडुलजी या निवडक महिला खेळाडूंपैकी एक आहेत, ज्यांना आयसीसी हॉल ऑफ फेम (ICC Hall of Fame) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतात सन 2023पूर्वी 7 क्रिकेटपटूंना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र, त्यात सर्व पुरुष खेळाडू होते. यावेळी हा सन्मान मिळवणारा वीरेंद्र सेहवाग 8वा खेळाडू, तर एडुलजी या 9व्या भारतीय खेळाडू बनल्या.
भारतासाठी सेहवाग आणि एडुलजी यांच्यापूर्वी हा सन्मान 2021मध्ये वीनू मांकड, 2019मध्ये सचिन तेंडुलकर, 2018मध्ये राहुल द्रविड, 2015मध्ये अनिल कुंबळे, 2010मध्ये कपिल देव, 2009मध्ये बिशन सिंग बेदी आणि सुनील गावसकर यांना मिळाला होता. सेहवाग आणि एडुलजी या क्लबमधील नवीन सदस्य आहेत, ज्यांना 2023मध्ये या पुरस्काराने सन्मानित केले आहे. सार्वकालीन हॉल ऑफ फेमच्या यादीत सर्वाधिक खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यांची संख्या 29 आहे. (three stars of the game have been added to the icc hall of fame including indian former cricketer virender sehwag)
हेही वाचा-
विराटने वनडेत 9 वर्षांनी घेतली विकेट, कॅप्टन रोहितही झाला खुश, पत्नी अनुष्काची रिऍक्शन वेधतेय लक्ष- Video
राहुल-श्रेयसने केली विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी, मोडला ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा 16 वर्षे जुना विक्रम