आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील साखळी सामने संपले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतील आपला सलग 9वा विजय साजरा केला.भारताच्या विजयात श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचे महत्त्वाचे योगदान होते. दोन्ही खेळाडूंनी शानदार शतके झळकावली आणि संघाची धावसंख्या 400 च्या पुढे नेली. श्रेयस अय्यरने 128 धावांची नाबाद खेळी खेळली तर राहुलने 102 धावा केल्या.दोन्ही खेळाडूंमध्ये 208 धावांची विक्रमी भागीदारी झाली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman GIll) यांनी भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आणि रोहित शर्मा, शुभमन गिल नंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले पण 200 धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाने विराट कोहलीच्या रूपाने तिसरी विकेट गमावली. केएल राहुल (KL Rahul) सह श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने चौथ्या विकेट्ससाठी 208 धावांची भागीदारी केली.विश्वचषकाच्या इतिहासातील चौथ्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या या भागीदारीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे विक्रम मोडीत काढले आहेत.
विश्वचषकाच्या इतिहासात मायकेल क्लार्क आणि ब्रॅड हॉज यांनी यापूर्वी 2007 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 204 धावांची मोठी भागीदारी केली होती, मात्र आता हा विक्रम भारतीय फलंदाजांच्या नावावर झाला आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी यापूर्वीचा भारतीय विक्रमही मोडीत काढला आहे. भारतासाठी केएल राहुल आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या स्पर्धेत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली होती. (Rahul and Shreyas put on the biggest partnership in World Cup history, breaking a 16-year-old record by Australian batsmen)
म्हत्वाच्या बातम्या
गरज नसताना गोलंदाजांनी कशाला टाकले वाईड यॉर्कर? सामन्यानंतर रोहितचा सर्वात मोठा खुलासा, वाचा प्लॅन
विकेट घेतली रे! नेदरलँड्सच्या कर्णधाराला विराटने दाखवला तंबूचा रस्ता, 9 वर्षांनंतर