क्रिकेट खेळाडूंची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख असते. पुर्वी एखादा क्रिकेटपटू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, परंतु आता त्याचबरोबर फिटनेस देखील एक ओळख बनली आहे. खेळाडू जितका जास्त तंदुरुस्त असेल, तेवढेच जास्त काळ देशासाठी प्रतिनिधित्व करू शकतो.
विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील तंदुरुस्तीचा आदर्श खेळाडू बनला आहे, फिटनेससाठी भारतीय कर्णधार विराट कोहली हा केवळ भारतातच नाही तर परदेशातही फेमस आहे. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून, भारतीय संघ आणि खेळाडूंची तंदुरुस्तीही वेगळ्या पातळीवर पोहोचली. परंतु जागतिक क्रिकेट संघात आणि भारतीय क्रिकेट संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी उत्तम आहे, परंतु तंदुरुस्तीच्या बाबतीत ते पिछाडीवर आहेत.
आज या लेखात तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, हिट आहेत परंतू फिट नाहीत
३. लसिथ मलिंगा (Lasith Malinga)
लसिथ मलिंगा हा खेळाडू खूपच अनफिट दिसत आहे, विश्वचषक स्पर्धेदरम्यान, त्याच्या वाढलेल्या पोटाबद्दल चर्चा सुरु होती. सध्या लसिथ मलिंगाने वनडे क्रिकेटला निरोप दिला आहे, परंतु शरीराने तंदुरुस्त नसले तरी त्याने आपल्या गोलंदाजीने हे सिद्ध केले आहे, की तो आजही कोणताही करिष्मा करु शकतो.
विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर महेला जयवर्धनेने मलिंगाचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, “हे सिक्स पॅकबद्दल नाही तर ते कौशल्याबद्दल आहे आणि लसिथ मलिंगाने इंग्लंडला पराभूत करून ते सिद्ध केले आहे. ”
त्याने ५९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३३.१६ च्या सरासरीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत. व्यतिरिक्त वनडे सामन्यात १२० डाव खेळले आहेत, ज्यात त्याने २८.८७ च्या सरासरीने ३३८ विकेट्स घेतल्या आहेत.
२. सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed)
पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराला कुणी कसे विसरू शकेल, विश्वचषक दरम्यान त्याचा जांभई देतानाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तर भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्याच्या देशातील लोकांनी त्याला गलिच्छ शिव्या दिल्या होत्या.
केवळ चाहतेच नव्हे तर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही सरफराजच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उठवले. अख्तर म्हणाला होता की,
“जेव्हा सरफराज टॉससाठी येतो तेव्हा त्याचे पोट बाहेर असते.”
पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याला मैदानावरील चाहत्यांनी “मोटा-मोटा” म्हणून हिणवले होते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. क्रिकेटच्या मैदानावरही त्याच्या चाहत्यांनी बर्याचदा त्यांची थट्टा उडवली आहे.
१. मोहम्मद शहजाद (Mohammed Shahzad)
हा अफगाणिस्तानाचा तोच खेळाडू आहे, ज्याला स्वतःचा इतका अभिमान आहे की, तो विराटच्या फिटनेसला काहीच मानत नाही, त्याला असे वाटते की जर मी विराटसारखे मोठे शॉट्स आताही खेळू शकतो, तर मी मेहनत कशाला करू.
काही वर्षांपूर्वी या खेळाडूने भारताविरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता, त्याला असा विश्वास होता की जेव्हा तो स्वत: कोहलीपेक्षा जास्त लांब षटकार मारू शकतो, तर विराटसारखे असण्याची गरज काय आहे?
विश्वचषकात १-२ सामन्यानंतर त्याला वगळण्यात आले होते, कारण तो तंदुरुस्त नव्हता, अशा परिस्थितीत क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूची तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे हे आता त्याला समजले असेलच.
त्याने २ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १७.२५ च्या सरासरीने ६९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने वनडे सामन्यात ८५ डाव खेळले, त्यामध्ये त्याने ३३.७ च्या सरासरीने २७६३ धावा केल्या त्याशिवाय क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात त्याने ३०.४९ च्या सरासरीने १८६० धावा केल्या आहेत.