इंडियन प्रीमीयर लीगचा १३ वा हंगाम संपून २-३ महिनेच उलटले नाहीत, तर १४ व्या हंगामाचे बिगूलही वाजले आहेत. येत्या १८ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये १४ व्या आयपीएल हंगामासाठी छोटा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी तब्बल १०९७ खेळाडूंनी नोंदणी केली होती. अखेर यातून लिलावासाठी केवळ २९२ खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली.
अंतिम निवड झालेल्या खेळाडूंमध्ये १६४ खेळाडू हे भारतीय आहे. यात अनेक अनुभवी तसेच युवा खेळाडू आहेत. विशेष म्हणजे यंदा या आयपीएल हंगामात काही माजी खेळाडूंच्या मुलांवरही बोली लागताना दिसणार आहे. भारताच्या ३ दिग्गज माजी क्रिकेटपटूंच्या मुलांची लिलावासाठी निवड झाली आहे. हे तीन कोणते क्रिकेटपटू आहेत, हे आज आपण पाहू.
३. सचिन तेंडुलकर – अर्जुन तेंडुलकर
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने २०१३ साली क्रिकेटपमधून निवृत्ती घेतली. त्याने २००८ ते २०१३ दरम्यान आयपीएलही खेळले. आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. कारण त्याचा या आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या लिलावात समावेश आहे. त्याची २० लाख ही लिलावासाठी मूळ किंमत आहे.
अर्जूनने नुकतेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याबरोबरच अर्जून यापूर्वी मुंबई टी२० लीगही खेळला आहे. याशिवाय तो भारताच्या १९ वर्षांखालील कसोटी संघातही खेळला आहे. अर्जून हा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे.
२. दिलीप दोशी – नयन दोशी
भारतीय संघाकडून ३३ कसोटी सामने खेळलेले माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचा मुलगा नयन दोशी हा देखील यंदा आयपीएल लिलावात सहभागी होणार आहे. त्याची अधारभूत किंमत २० लाख आहे.
विशेष म्हणजे नयनचे वय ४२ वर्षे आहे. त्यामुळे तो या लिलावात सहभागी होणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून क्रिकेट खेळले आहे. तसेच याआधी तो आयपीएलमध्ये ४ सामने खेळला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. ४ सामन्यात त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत.
१. सईद किरमाणी – सादिक किरमाणी
सचिन आणि दिलीप दोशींप्रमाणेच सईद किरमाणी या माजी दिगग्ज भारतीय यष्टीरक्षकाचा मुलगा सादिक किरमाणी हा देखील यंदा आयपीएल लिलावात सहभागी होणार आहे. ८० आणि ९० च्या दशकादरम्यान भारतीय संघातील महत्त्वाचे सदस्य असलेले सईद किरमाणी यांचा मुलगा सादिकची यंदाच्या आयपीएल लिलावासाठी २० लाख ही मूळ किंमत असणार आहे.
सादिकने आत्तापर्यंत कर्नाटक संघासाठी केवळ २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात ३१ वर्षीय सादिकने केवळ २५ धावा केल्या आहेत. हे दोन्ही सामने त्याने २०१५ साली खेळले आहेत. याबरोबरच तो कर्नाटक प्रमीयर लीग खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष : एक नाही, दोन नाही; तब्बल ५२ वर्ष आहे अबाधित ‘या’ भारतीयाचा कसोटी विक्रम
IPL 2021: वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिळवली लिलावात जागा, आता रोहितचा संघ लावणार मोठी बोली?