---Advertisement---

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी (आरसीबी) आयपीएल २०२१ ची सुरुवात दमदार झाली आहे. स्पर्धेच्या इतिहासात आरसीबी प्रथमच पहिले तिन्ही सामने जिंकण्यात संघ यशस्वी झाला. आता संघ पुढील सामने खेळण्यासाठी चेन्नईहून मुंबईला पोहोचला आहे. या संघासह कॉमेडियन दानिश सेंटही असून त्याला ‘मिस्टर नॅग्स’ म्हटले जाते. चेन्नईहून मुंबईकडे येताना मि. नॅग्स विमानातील केबिन क्रूचा सदस्य बनला आणि त्याने या कालावधीत खेळाडू आणि सहयोगी स्टाफ यांना हसविण्याची जबाबदारी निभावली.

विमानातील मजेदार व्हिडिओ व्हायरल
विमानातील एक व्हिडिओ आरसीबीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यात कॉमेडियन दानिश क्रू मेंबर बनून आला. या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “फ्लाइट चेन्नईहून मुंबईला ९० मिनिटांत पोहोचेल. जर आपण यापेक्षा जास्त वेळ घेतला तर कर्णधाराला दंड होईल आणि होय, आमच्या कर्णधाराला याची सवय आहे.”

मि. नॅग्सचा रोख विराट कोहलीकडे होता. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत विराटला आयसीसीकडून संथ गतीने षटके टाकल्यामुळे मोठा दंड ठोठावण्यात आला होता.

विराटची घेतली मजा
मि. नॅग्स येथेच थांबला नाही. त्याने विराटची मजा घेताना पुढे म्हटले, “आपत्कालीन परिस्थितीत नेहमी एबी डिव्हिलियर्सवर अवलंबून राहू नये. तुम्हीही काहीतरी करा. मॅक्सवेल, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी आत्तापर्यंत संघासाठी उपयुक्त कामगिरी केली. मी आशा करतो की, त्यांनी भविष्यातही हे काम चालू ठेवावे. आता आपण मुंबई गाठली आहे. तुम्ही तिथे काहीतरी करून दाखवा.”

विराटला आवडला नाही सल्ला
आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीने अद्यापपर्यंत एकही सामना गमावला नाही. स्पर्धेच्या इतिहासात आरसीबीने प्रथमच पहिले तीन सामने जिंकले आहेत. यावर नॅग्सने संघाचा कर्णधार कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला दिला. तो म्हणाला की, “आपण बेंगलोरला परतूया. आपण सध्या नंबर १ आहोत. सर्वकाही संपवून परतूया. कारण परिस्थिती दरवेळी एकसारखी राहत नाही.” यावर कोहली म्हणतो की, “या व्यक्तीला कोणीतरी विमानातून फेकून द्यावे.”

आरसीबीचा पुढील सामना गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सशी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---