भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर जेव्हा जेव्हा उतरला तेव्हा त्याने खेळात आपले शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. धोनी संघाचे नेतृत्त्व आणि यष्टीरक्षणासोबतच मैदानावरील आपल्या विनोदी समालोचनासाठीही फार प्रसिद्ध होता. जेव्हा धोनी मैदानात असायचा तेव्हा त्याचे मजेदार संभाषण बर्याचदा स्टंप माइकमध्ये टिपले जायचे. 2014 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौर्यावर धोनीने चेतेश्वर पुजारासाठी असे वाक्य बोलले होते की त्याची चर्चा आजपर्यंत होत असते.
2014 मध्ये भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या वेलिंग्टन कसोटीदरम्यान ब्रेंडन मॅक्युलम आणि बी.जे. वॅटलिंग यांनी मोठी भागीदारी रचली होती. या सामन्यातच ब्रेंडन मॅकलमने त्रिशतक झळकावत सामना अनिर्णित राखला होता.
दरम्यान रविंद्र जडेजा गोलंदाजीसाठी आला होता. जडेजा गोलंदाजी करताना धोनीच्या सूचनांचे पालन करत नव्हता. यावेळी धोनीने जडेजाला आपल्या रणनीतीची आठवण करून दिली आणि त्याला सांगितले की पुजाराला स्लीपमध्ये टाळी वाजवण्यासाठी नाही तर कॅच घेण्यासाठी उभे केले आहे.
धोनी म्हणाला की, “जर चेंडू स्पिन झाला तर त्यासाठी पुजाराला येथे ठेवण्यात आले आहे. तो येथे टाळ्या वाजवण्यासाठी उभा नाही.” धोनीची ही चर्चा स्टंप माइकवर रेकॉर्ड झाली होती आणि काही वेळात ती व्हायरल देखील झाली होती.
https://twitter.com/Swastheek/status/843722208472109056?s=20
धोनी आणि जडेजा यांच्यातील संबंध खूप मैत्रीपूर्ण आहेत. दोघेही बर्याचदा सोबत विनोद करताना दिसतात. दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून देखील एकत्र खेळतात. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातून निवृत्ती घेतल्याने क्रिकेटचाहत्यांना आता त्याचे भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दर्शन घडत नाही. परंतु तो निवृत्तीनंतरही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डब्ल्यू व्ही रमन यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हटवण्यात आल्याने उभे झाले प्रश्न
टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या आहेच, पण संघाला माझीही तेवढीच गरज; ‘या’ अष्टपैलूचे मोठे वक्तव्य
अवघ्या ७ दिवसात गाठले ११ कोटींचे लक्ष्य, देणगी देणाऱ्यांचे ‘विरुष्का’ने मानले आभार





