पुणे। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमामधील पुणे लेग आजपासून सुरु होणार आहे. 18ऑक्टोबर ते 24ऑक्टोबर असे तब्बल 8 दिवस पुण्यनगरीत हे सामने रंगणार असून त्यात एकूण 11सामने होणार आहे.
प्रो कबड्डीमधील पुण्याच्या संघाचे नाव पुणेरी पलटण असे असून ह्या संघाचे होम ग्राउंड हे श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी, पुणे हे आहे. पुण्यातील या भव्य अशा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कबड्डीचे सामने रंगणार आहेत.
या सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरु झाली आहे. यावेळी तिकिटांचे दर हे 300 ते 6500 रुपयांपर्यंत आहेत.
कबड्डीबरोबरच 27 आॅक्टोबरला पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यासाठीही तिकीट विक्री सुरु झाली आहे. या सामन्यासाठी 800, 1100, 1750, 2000, 3500 असे तिकीटांचे दर आहेत.
असे आहेत पुण्यात होणाऱ्या सामन्यांचे दर-
प्रो कबड्डी: तिकिटं दर-
18 आॅक्टो- 300, 800, 1200, 2000, 5000 (एक सामना)
19- आॅक्टो- 700, 1200, 2000, 2500, 6000 (दोन सामने)
20 आॅक्टो- 700, 1400, 2200, 3500, 6500 (दोन सामने)
21 आॅक्टो- 700, 1300, 2100, 2500, 6000 (दोन सामने)
23 आॅक्टो- 700, 1200, 2000, 2500, 6000 (दोन सामने)
24 आॅक्टो- 700, 1200, 2000, 2500, 6000 (दोन सामने)
भारत विरुद्ध विंडीज वन-डे सामना- 27आॅक्टोबर
तिकिटं दर- 800, 1100, 1750, 2000, 3500
महत्त्वाच्या बातम्या:
–कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?
–वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ
–असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!