भारत विरुद्ध विंडिज संघात 21 आॅक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताच्या वनडे संघात दमदार पुनरागमन करणारा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
जडेजाने जर या मालिकेत 15 विकेट्स घेतल्या तर तो विंडिज विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. त्याने आत्तापर्यंत विंडिज विरुद्ध 19 वनडे सामन्यात 27.72 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत.
विंडिज विरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत जडेजा सध्या 6 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर दिग्गज माजी गोलंदाज कपिल देव आहे. त्यांनी 42 सामन्यात 43 विकेट्स घेतल्या आहेत.
त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आहे. त्याने 26 वनडे सामन्यात 41 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे जडेजाला या विक्रमाच्या यादीत त्याचे स्थान वधारण्याची संधी आहे.
जडेजा मागील एक वर्ष वनडे क्रिकेटपासून दूर होता. पण मागील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या एशिया कपमध्ये त्याला दुखापत ग्रस्त अक्षर पटेलच्या ऐवजी संधी देण्यात आली होती.
या संधीचा योग्य फायदा घेत जडेजाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याने विंडिज विरुद्धच्या भारतीय वनडे संघातही जागा पक्की केली.
महत्त्वाच्या बातम्या:
–वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ
–असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!
–कसोटी पदार्पणातच १८ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा आज ५०वा वाढदिवस






