---Advertisement---

धक्कादायक! सुप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स कार अपघातात गंभीर जखमी

On: बुधवार, फेब्रुवारी 24, 2021 7:26 AM
---Advertisement---

क्रीडाजगताला धक्का देणारी दुर्घटना मंगळवारी(२३ फेब्रुवारी) सकाळी अमेरिकेत घडली आहे. सुप्रसिद्ध गोल्फर टायगर वुड्स कार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. कॅनिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे ही दुर्घटना घडली.

वूड्स यांची कार ब्लॅकहॉर्स रोड येथील हॉथॉर्न बुलेव्हार्ड येथून उत्तरेकडे जात असताना मंगळवारी सकाळी सव्वासातच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. लॉस एंजेलिस काऊंटी शेरिफ डिमार्टमेंटने सांगितल्यानुसार हा अपघात इतका जबरदस्त होता की वूड्स यांना अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढावे लागले. तसेच गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातावेळी वूड्स कारमध्ये एकटे होते.

या अपघातावेळी दुसऱ्या कोणत्याही कारचा समावेश नव्हता. तसेच दुसऱ्या कोणत्याही गाडीला नुकसान झालेले नाही.

या अपघातानंतर ४५ वर्षीय वूड्स यांना हार्बर-यूसीएलए मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. वूड्स यांचा व्यवस्थापक मार्क स्टेनबर्गने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पायांना दुखापती झाल्या असून त्यावर शस्त्रक्रिया होत आहे.

वूड्स रस्ता अपघातात जखमी होण्याची ही तिसरी वेळ आहे.

वूड्स यांच्या नावावर ६८३ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम आहे. तसेच या आठवड्यात ते जागतिक क्रमवारीत ५० व्या क्रमांकावर होते.  त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील १५ मोठी विजेतीपदे जिंकले आहेत.

मागील महिन्यातच झाली होती पाठीवर शस्त्रक्रिया

गोल्फमध्ये मोठे नाव कमावलेल्या वूड्स यांना पाठीच्या दुखापतीचा त्रास असल्याने त्यांनी मागील महिन्यातच शस्त्रक्रिया केली होती. त्याचमुळे ते अगामी दोन स्पर्धेत खेळणार नव्हते. पण आता कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने ते आता किती काळ गोल्फपासून दूर राहणार हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या –

“मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळत नाही, हे एकप्रकारे चांगले आहे”, भारतीय क्रिकेटरचे भाष्य

“आम्ही अजूनही तिसऱ्या कसोटीसाठीचे गोलंदाजी आक्रमण निश्चित केले नाही”, सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लिश कर्णधार जो रूटचे प्रतिपादन

देश की आयपीएल? पहा काय दिले मुस्तफिझुर रहमानने उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---