पुणे। मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत टायगर्स, एफसी बिटल्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात प्रशांत गोसावी, ऋतुपर्ण कुलकर्णी, योगेश पंतसचिव, पराग नाटेकर, अनुप मिंडा, अमित लाटे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर टायगर्स संघाने एफसी मेटॅलिका संघाचा 24-03 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात एफसी बिटल्स संघाने एसेस युनायटेड संघावर 17-12 असा संघर्षापुर्ण विजय मिळवला. विजयी संघाकडून रोहित शेवाळे, अशोक अगरवाल, गणेश देवखिले, वैभव अवघडे यांनी सुरेख कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
टायगर्स वि.वि.एफसी मेटॅलिका 24-03 (100अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतुपर्ण कुलकर्णी वि.वि.अभय सोनटक्के/शौनक कासट 6-0; 90 अधिक गट: योगेश पंतसचिव/पराग नाटेकर वि.वि.महेंद्रदेवकर/अमित नूलकर 6-0; खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे वि.वि.लक्ष्मण विडेकर/सुमित सातोस्कर 6-2; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे पराभूत वि.नितेश बंदेवार/नकुल फिरोदिया 6-1);
एफसी बिटल्स वि.वि.एसेस युनायटेड 17-12(100अधिक गट: सुनील लोणकर/शैलेश पटवर्धन पराभूत वि.मयूर पारेख/सुनील लुल्ला 2-6; 90 अधिक गट: रोहित शेवाळे/अशोक अगरवाल वि.वि.सुनील खेलचंदानी/होझिफा हकीम 6-0; खुला गट: गणेश देवखिले/वैभव अवघडे वि.वि.अमित शर्मा/रतिश ऋतुसरिया 6-0; खुला गट: श्रेयस गजेंद्रगडकर/दिविजा पराभूत वि.सुनील लुल्ला/रोहन नाईक 3-6)
महत्त्वाच्या बातम्या –
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली
‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ग्लॅडिएटर्स, लायन्स, एफसी जीएनआर संघांची विजयी सलामी
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले