पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत लायन्स, टायगर्स, एफसी जीएनआर या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चुरशीच्या लढतीत एफसी जीएनआर संघाने डेक्कन ऍव्हेंजर्सचा 18-17 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून संजय रासकर, पुष्कर पेशवा, संग्राम चाफेकर, यश देशमुख यांनी सुरेख कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात रोहन दळवी, राजू साठे, अमित नाटेकर, राहुल मुथा, नरहर, ध्रुव मेड, सारंग देवी यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर लायन्स संघाने ओडीएमटी 1 संघाचा 24-14 असा पराभव केला.
अन्य लढतीत टायगर्स संघाने टेनिसनट्स फेडल संघाचा 24-11 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. टायगर्सकडून प्रशांत गोसावी, ऋतू कुलकर्णी, योगेश पंतसचिव, अमित लाटे, केदार शहा, अभिषेक ताम्हाणे, अनुप मिंडा यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल: साखळी फेरी:
लायन्स वि.वि.ओडीएमटी 1 24-14(100 अधिक गट: रोहन दळवी/राजू साठे वि.वि.व्ही एस गुप्ते/मारुती राऊत 6-2; 90 अधिक गट: अमित नाटेकर/राहुल मुथा वि.वि.कोनार कुमार/गणेश जोशी 6-5(7-4); खुला गट: नरहर/ध्रुव मेड वि.वि.अतुल जोशी/हिमांशू कपाटिया 6-5(9-7); खुला गट: सारंग देवी/रोहन दळवी वि.वि.कौस्तुभ देशमुख/मारुती राऊत 6-2);
एफसी जीएनआर वि.वि.डेक्कन ऍव्हेंजर्स 18-17(100 अधिक गट:संजय रासकर/पुष्कर पेशवा वि.वि.संतोष जयभाई/आनंद कोटस्थाने 6-3; 90 अधिक गट: पंकज यादव/जान्हवी सुंदरराजन पराभूत वि.केतन जाठर/अभिजीत मराठे 2-6; खुला गट: अनिश नवाथे/शांभवी नाडकर्णी पराभूत वि.शिबाजी यादव/संतोष जयभाई 4-6; खुला गट: संग्राम चाफेकर/यश देशमुख वि.वि.गोपीनाथ/अनिरुद्ध 6-2);
टायगर्स वि.वि.टेनिसनट्स फेडल 24-11(100 अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतू कुलकर्णी वि.वि.भट/जॉय बॅनर्जी 6-0; 90 अधिक गट: योगेश पंतसचिव/अमित लाटे वि.वि.सी कुमार/दिपक पाटील 6-4; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.जॉय बॅनर्जी/रवी कोठारी 6-3; खुला गट: ऋतू कुलकर्णी/अनुप मिंडा वि.वि.वेंकटेश आचार्य/अजिंक्य पाटकर 6-4
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी मेटालिका संघांचे विजय
चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन जोडीला विजेतेपद