वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लॉरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि मालिका वेस्ट इंडीजने नावावर केली. असे असले तरी भारतीय संघासाठी या दौऱ्यावर एकमेव सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे भारताला तिलक वर्मा याच्या रूपाने एक सक्षम फलंदाज मिळाला.
देशांतर्गत क्रिकेट व आयपीएल मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तिलक याला या दौऱ्यावरील टी20 मालिकेसाठी संधी मिळाली होती. पहिल्याच सामन्यात फलंदाजीला आल्यावर त्याने या संधीचे सोने केले. त्याने आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याची किमया केली होती. भारताने गमावलेल्या या सामन्यात 22 चेंडूचा सामना करत सर्वाधिक 39 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याला आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण करण्यात यश आले. त्याने 51 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात नाबाद 49 धावांची खेळी करत त्याने भारताच्या विजया योगदान दिले. चौथ्या सामन्यात त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही व तो 7 धावांवर नाबाद राहिला.
मालिकेतील अखेरच्या सामन्यात देखील त्याच्या बॅटमधून 27 धावा निघाल्या. विशेष म्हणजे या सामन्यात त्याला एक शतक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर निकोलस पूरन याला बाद देखील केले. तसेच क्षेत्ररक्षणात देखील तो अव्वल दिसला. त्याचा हाच अष्टपैलू खेळ भारतीय संघासाठी या मालिकेतील जमेची बाजू राहिल्याचे दिसत आहे.
(Tilak Varma Being Positive Sign For Team India In T20 Series Loss)
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तान संघाला लाभला भारतीय गुरु! तब्बल 32 वर्षांचा अनुभव करणार शेअर
वेस्ट इंडीज दौऱ्यावर संजू पूर्णपणे फ्लॉप! खराब कामगिरीने पुन्हा आला चाहत्यांच्या निशाण्यावर