माजी क्रिकेटर सबा करीम यांनी युवा डावखुरा फलंदाज टिळक वर्मा याचे खूप कौतुक केले आहे. ते म्हणाले की, भारतीय संघ अनेक दिवसांपासून डाव्या हाताच्या स्फोटक फलंदाजाच्या शोधात होता आणि त्यांचा शोध टिळक वर्मावर येऊन संपू शकतो. सबा करीमच्या मते, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टिळक वर्माभारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी टिळक वर्मा (Tilak Verma) देखील भारतीय संघाचा एक भाग आहे. पहिल्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळू शकते. (tilak varma could play integral role for india in white ball cricket)
सबा करीम (Saba Karim) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले आणि म्हटले की, टिळक वर्मा याच्या निवडीचा भारतीय संघाला खूप फायदा होऊ शकतो. पुढे बोलताना ते म्हणाले, मला वाटते की, “पांढर्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये टिळक वर्मा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याच्यात पूर्ण क्षमता आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची ही दूरदृष्टी आहे. त्यांना संघात युवा खेळाडू आणि विशेषतः डावखुरे खेळाडू आणण्याची गरज आहे. जेव्हा डावखुरे खेळाडू असतात तेव्हा विरोधी संघाच्या अडचणी वाढतात. त्यामुळेच राहुल द्रविडने डावखुऱ्या फलंदाजांवर जास्त विश्वास दाखवला आहे.”
जर आपण टिळक वर्माबद्दल बोललो, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात खूपच जबरदस्त होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत पदार्पण करताना टिळक वर्माने जबरदस्त कामगिरी केली. त्याने पाच सामन्यांमध्ये एकूण 173 धावा केल्या आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू देखील होता. तेव्हापासून, तो सतत संघाचा भाग आहे आणि त्याने आतापर्यंत एकूण 310 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 पेक्षा जास्त आहे. (This player is very important in India’s ODI and T20 teams former cricketer’s statement about the young batsman)
हेही वाचा
‘माझ्या एंट्रीला तेच गाणं वाजवा’, क्रिकेटरने केली होती डीजेकडे अजब मागणी
इशान किशनचे करिअर का धोक्यात? 25 वर्षीय खेळाडूने कोणती ‘चूक’ केली? वाचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर