आशिया चषक 2023 स्पर्धेची सुरवात 30 ऑगस्ट पासून होणार आहे. स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाने 21 ऑगस्टला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यात युवा खेळाडू तिलक वर्मा याला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर तिलकने कर्णधार रोहित शर्मा बद्दल वक्तव्य केले आहे.
बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिलक वर्मा (Tilak Varma) म्हणाला की, “रोहित (Rohit Sharma) भैय्या नेहमीच मला पाठीशी घालतो आणि मला पाठिंबा देतो. आयपीएल दरम्यान, मी थोडा चिंतेत होतो परंतू त्याने माझ्याशी संवाद साधून मला प्रोत्साहन दिले. तो नेहमी मला संगतो की फक्त तू तुझ्या खेळाचा आनंद घे आणि मुक्तपणे खेळ. रोहित भैय्या मला माझ्या फलंदाजीसाठी पुर्ण स्वातंत्र देतो.”
तिलकने आपीयलमध्ये चांगली फलंदाजीची शैली दाखवली आहे. त्याने आपीयलच्या गेल्या दोन्ही हंगामात उत्कृष्ट प्रदर्शन करून निवड समितीला प्रभावित केला. यामुळे भारतीय क्रिकेट निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर तिलकची निवड केली. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तिलकने 5 टी20 सामन्यात 140 च्या स्ट्राईक रेटने 173 धावा केल्या. वेस्ट इंडिज दौऱ्यावरची त्याची कामगिरी पाहता भारतीय निवड समितीकडून युवा फलंदाजाला आशिया चषक 2023 साठी संघात सहभागी करून घेण्यात आले.
पदार्पणानंतर अवघ्या काही दिवसांनी आशिया चषकमध्ये मिळाली संधी
तिलकने वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्या फलंदाजीमध्ये खूप समजूतदारपणा दाखवला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचे म्हणने आहे की, तिलक त्याच्या वयापेक्षा जास्त समजूतदार खेळाडू आहे. युवा खेळाडूने भारतीय संघासाठी सध्या फक्त टी20 अंतरराष्ट्रीय प्रकारात पदार्पण केले आहे. आता तो आशिया चषक स्पर्धेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर त्याने आशियाई चषकातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असेल तर तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल? हा मोठा प्रश्न आहे. तिलकने आतापर्यंत 7 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 174 धावा केल्या आहेत. (tilak varma say’s rohit sharma is my support system)
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 मध्ये सेतुरामन एसपी आघाडीवर
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती