सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. भारताच्या या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होईल. तत्पूर्वी, 5 जुलै रोजी या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी खेळाडूंना या संघात जागा मिळाली नसली तरी, अनेक युवा खेळाडूंना या संघात संधी दिली गेली. मागील दोन हंगामापासून आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या तिलक वर्मा याला प्रथमच भारतीय संघात समाविष्ट केलेले आहे. भारताचा तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मा यांनी अगदी दोन महिन्यांपूर्वीच तो लवकरच भारतीय संघात दिसेल असे भाकीत केले होते. हे भाकीत खरे ठरले.
टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांना या संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे तिलक या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. त्याने मागील दोन आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळताना सर्वोत्तम कामगिरी केलीये.
आयपीएल 2023 मध्ये त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहून रोहित शर्मा म्हणाला होता,
“त्याच्यामध्ये एक मोठा खेळाडू होण्याची सर्व कुवत आहे. तो लवकरच मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त अन्य दुसऱ्या ब्ल्यू जर्सी दिसून येईल.”
यामध्ये रोहितचा रोख हा भारतीय संघातील त्याच्या समावेशाकडे होता. त्यानंतर आता अवघ्या दोन महिन्यातच त्याची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसते.
तिलकने यावर्षी मुंबईसाठी विविध क्रमांकावर फलंदाजी करताना 14 सामन्यात 397 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 36 पेक्षा अधिक तर स्ट्राईक रेट 130 पेक्षा जास्त होता. तिलक डावखुरा फलंदाज असल्याने आगामी काळात तो भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचा फलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो.
(Tilak Varma Selected In Team India Rohit Sharma 2 Month Ago Gives Hint)
महत्वाच्या बातम्या –
सराव सामन्यात मुंबईकरांची सॉलिड ओपनिंग! विराट फ्लॉप, पुन्हा केली तीच चूक
‘या’ कारणाने रिंकू सिंगला नाही मिळाली टीम इंडियात जागा, थोडक्यात हुकली संधी