---Advertisement---

गुजरातविरुद्ध 14 चेंडूत 43 धावा चोपणाऱ्या तिलकला सेहवागचा लाख मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘तू फक्त…’

On: सोमवार, मे 29, 2023 4:50 PM
Tilak-Varma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत असे अनेक युवा खेळाडू होते, ज्यांनी आपल्या विस्फोटक फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या दिग्गजांचेही लक्ष वेधून घेतले. त्यापैकीच एक म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा होय. तिलकबद्दल अनेक दिग्गजांनी मते मांडली आणि सल्लेही दिले. आता त्यात भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश झाला आहे. तिलकच्या प्रदर्शनाने सेहवागही प्रभावित झाला आहे. सेहवागने तिलक वर्मा याला सल्ला दिला आहे.

तिलक वर्मा (Tilak Varma) याने क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स संघाच्या 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघासाठी अवघ्या 14 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी साकारली होती. तिलकच्या याच प्रदर्शनाची प्रशंसा करत वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की, त्याने आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष द्यावे आणि ती कौशल्ये ओळखावी, ज्यावर तो काम करू शकतो.

सेहवाग म्हणाला की, “त्याने दोन गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा करणे आमि त्या कौशल्यांची ओळख करणे, ज्यावर तो काम करू शकतो. तसेच, मानसिकताही. असे नेहमी होते की, जेव्हा तुम्ही नियमित क्रिकेट खेळता, तेव्हा त्यावेळी तुम्ही वेळेनुसार स्वत:ला बदलता. मात्र, जेव्हा तुम्ही खेळत नसता, तेव्हा तुम्हाला तुमच्या फिटनेस आणि आपल्या कौशल्यांवर लक्ष द्यावे लागते. सूर्यकुमार यादवप्रमाणे, ज्याने आपल्या शॉट्ससाठी खूप सराव केला आहे.”

सेहवागने तिलकला त्याच्या कमजोरींवरही काम करण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. यावर तो म्हणाला की, 20 वर्षीय तिलक वर्माने त्याला स्वत:ची आठवण करून दिली. “तिलकने त्याच्या कमजोरी सुधारण्यावर लक्ष दिली पाहिजे. हे मला स्वत:ची आठवण करून देते, जेव्हा मी 1999मध्ये पहिल्यांदा भारतीय संघासाठी खेळलो होतो, तेव्हा मला शोएब अख्तरने बाद केले होते. मी माझी बॅट खाली आणेपर्यंत, चेंडू माझ्या पॅडवर लागला होता.”

पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “त्यावेळी दादाने (सौरव गांगुली) मला एक सांगितले की, परत जा, वेगवान गोलंदाजांविरुद्ध सराव कर. जेणेकरून तू चांगल्याप्रकारे तयार होऊन येशील. मी मधल्या फळीत खेळायचो, मला फिरकी मिळाली आणि जोपर्यंत वेगवान गोलंदाज आले, मी आधीच एक शतक ठोकले होते. अशाप्रकारे तिलक वर्माला हे पाहण्याची गरज आहे की, त्याची कमजोरी कुठे आहे.”

आयपीएल 2022मध्ये पदार्पण करणाऱ्या तिलकने 14 सामन्यात 36.09च्या सरासरीने 397 धावा केल्या होत्या. त्याने 2023च्या हंगामात आपल्या खेळात सुधारणा केली आणि 11 सामन्यात 42.88च्या सरासरीने 343 धावा चोपल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश होता. त्याची नाबाद 84 ही हंगामातील सर्वोत्तम खेळी होती. (tilak varma should focus on improving his weaknesses said virender sehwag)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याने काय आयुष्यभर खेळावं…?’, धोनीच्या IPL निवृत्तीवर स्पष्टच बोलले कपिल देव
मोठी बातमी! IPL फायनलपूर्वी समजली गिलची सर्वात मोठी कमजोरी, भारताच्या माजी दिग्गजाचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---