ठरलेल्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 28 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला नाही. त्यामुळे आता गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासोबतच सर्व चाहत्यांच्या नजरा गुजरात टायटन्स संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यावरही लागल्या आहेत. तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकीकडे, सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे, समालोचक आकाश चोप्राने शुबमन गिलची कमजोरी सांगितली आहे.
‘शुबमन गिल याने अधिकतर धावा पहिल्या डावात केल्या’
भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याच्या प्रदर्शनावर चर्चा केली. त्याच्या मते, गिलने आतापर्यंत या हंगामात अधिकतर धावा पहिल्या डावात केल्या आहेत. त्याच्या मते, दुसऱ्या डावात गिलची सरासरी कमी होते, तेव्हा संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “जर शुबमन गिल प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला, तर त्याची सरासरी जवळपास 100च्या आसपासची आहे. त्याने इथूनच एकापेक्षा जास्त शतके आणि अर्धशतके केली आहेत. यामध्ये अधिकतर धावा पहिल्यांदा फलंदाजी करताना आल्या आहेत.”
‘दुसऱ्या डावात गिलची सरासरी खूपच कमी’
आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाला की, “गिलने या हंगामातील पहिल्या सामन्यात सीएसकेविरुद्ध धावा केल्या आहेत आणि त्यानंतरही धावा केल्या आहेत. मात्र, जेव्हा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येतो, तेव्हा त्यादरम्यान त्याची सरासरी 100हून घसरून 40ची होते. मात्र, दुसऱ्यांच्या बाजूने पाहिलं, तर हे खूपच चांगलं आहे. मात्र, जर गिलच्या बाजूने पाहिलं, तर हे कमी वाटते, जे एक मोठे अंतर आहे.”
आयपीएल 2023मधील गिलचे प्रदर्शन
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यात 60.79च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 3 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने या सामन्यात जर 122 धावा केल्या, तर तो विराट कोहली (Virat Kohli) याचा एका हंगामात सर्वाधिक 973 धावा करण्याचा विक्रम मोडू शकतो. (ipl 2023 this former cricketer tells about shubman gill greatest weakness before csk vs gt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला लागू होत नाही इम्पॅक्ट प्लेयर नियम! भारतीय दिग्गजाने सकारण दिले पटवून
IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?