सोमवारी (22 एप्रिल) आयपीएल 2024 चा 38वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माची बॅट चांगलीच तळपली. तिलक वर्मानं 45 चेंडूत झंझावाती 65 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे, या धावा अशा वेळी आल्या जेव्हा मुंबई इंडियन्सला त्याची खूप गरज होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. ईशान किशन आणि रोहित शर्मा लवकर बाद झाले. सूर्यकुमार यादवही काही कमाल करू शकला नाही. एकवेळ मुंबईची अवस्था 4 बाद 52 अशी दयनीय झाली होती. तेव्हा तिलक वर्मा संकटमोचक बनून मुंबईसाठी धावून आला. त्यानं क्रीजवर येताच चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. लवकरच तिलक वर्मानं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवं अर्धशतक ठोकलं
या सामन्यात तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यानं कठीण काळात मुंबई इंडियन्सची फलंदाजी सावरली. तो 45 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 65 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांच्यात 52 चेंडूत 99 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली, ज्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम 20 षटकांत 179 धावसंख्येपर्यंत पोहचू शकली.
21 वर्षीय तिलक वर्मानं या सामन्यात एक मोठा टप्पा गाठला. आयपीएलमध्ये 1000 धावा करणाऱ्या सर्वात युवा फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिलकनं वयाच्या 21 वर्ष 166 दिवसांत आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात 1000 धावा करणारा फलंदाज ऋषभ पंत आहे. त्यानं वयाच्या 20 वर्ष 218 दिवसांमध्ये हा पराक्रम केला होता.
आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण करणारे सर्वात कमी वयाचे फलंदाज
ऋषभ पंत – 20 वर्ष 218 दिवस
यशस्वी जयस्वाल – 21 वर्ष 130 दिवस
तिलक वर्मा – 21 वर्ष 166 दिवस
पृथ्वी शॉ – 21 वर्ष 169 दिवस
संजू सॅमसन – 21 वर्ष 183 दिवस
महत्त्वाच्या बातम्या –
संदीप शर्मा समोर येताच सूर्या विसरतो बॅटिंग! आकडेवारी एवढी खराब की विश्वासच बसणार नाही
युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी! बनला आयपीएलमध्ये 200 विकेट पहिला गोलंदाज
आयपीएल 2024 चा सिक्सर किंग कोण? कोणी लगावलाय सर्वात लांब षटकार? जाणून घ्या टॉप-5 फलंदाज






