इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या विजयाचा नायक असलेल्या तिलक वर्माने टी20 मध्ये एक विश्वविक्रम रचला आहे. गेल्या चार डावांमध्ये तो बाद झालेला नाही आणि त्याने यादरम्यान 318 धावा केल्या आहेत. जे दोन बाद होण्यादरम्यान कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तिलक शेवटचा बाद झालेला. त्यानंतर त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई टी20 मध्ये 72* धावांची सामना जिंकवणारी खेळी खेळली. इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे यजमानांनी 2 विकेट आणि 4 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.
तिलक वर्मा शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याच्या डावात त्याने 55 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार 5 उत्तुंग षटकार मारले. यासह, तिलक वर्मा पूर्ण सदस्य संघांमध्ये बाद न होता टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनच्या नावावर होता. ज्यांनी नाबाद राहून 271 धावा केल्या होत्या.
भारताचे इंग्लंडविरुद्ध अजून तीन टी20 सामने बाकी असल्याने तिलक वर्माला यादीत आणखी वर जाण्याची संधी आहे.
टी20 मध्ये दोन बादांवर सर्वाधिक धावा
318* तिलक वर्मा (107*, 120*, 19*, 72*)
271मार्क चॅपमन (65*, 16*, 71*, 104*, 15)
240श्रेयस अय्यर (57*, 74*, 73*, 36)
239 डेव्हिड वॉर्नर (100*, 60*, 57*, 2*, 20)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाची पुन्हा एकदा वाईट सुरुवात झाली. दोन्ही सलामीवीर फिल साल्ट (4) आणि बेन डकेट (3) स्वस्तात परतले. गेल्या सामन्याप्रमाणे यावेळीही कर्णधार जोस बटलर संघाचा तारणहार ठरला. तो संघाचा सर्वाधिक 45 धावा केल्या. शेवटी, ब्रायडन कार्सेने 17 चेंडूत 31 धावा करत संघाला 165 धावांपर्यंत पोहोचवले.
166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियालाही चांगली सुरुवात मिळाली नाही. गेल्या सामन्याचा हिरो अभिषेक शर्मा 12 धावा काढून बाद झाला तर संजू सॅमसन 5 धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माला मधल्या फळीत कोणतीही साथ मिळाली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारखे अनुभवी खेळाडूही जास्त काळ क्रीजवर टिकू शकले नाहीत.
तिलकने वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांच्यासोबत छोट्या भागीदारी करून संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. तिलक वर्माला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा-
Padma Awards; टीम इंडियाच्या ‘वाॅल’ला पद्मभूषण, या खेळाडूंनाही मिळणार सन्मान
भारताचा फिरकी जादूगार रविचंद्रन अश्विनला पद्मश्री पुरस्कार जाहीर…!
IND vs ENG; अटीतटीच्या सामन्यात भारताचा शानदार विजय, तिलक वर्मा एकटाच भिडला