भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरम याठिकाणी खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दोन विकेट्स राखून विजय मिळवला होता. कर्णधार सूर्यकुमार यादव सामनावीर पुरस्कार जिंकला, पण रिंकू सिंग याचेही सर्वत्र कौतुक झाली. आता तिलक वर्मा यानेही रिंकू सिंगप्रमाणे फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे विश्वचषक 2023 (ODI WC 2023) चा अंतिम सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघ अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत उतरला. गुरुवारी (23 नोव्हेंबर) पहिल्या टी-20 सामन्यात रिंकू सिंग (Rinku Singh) याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी तिलक वर्मा यानेही रिंकूप्रमाणे सामन्याचा शेवट करण्याची इच्छा व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 12 धावा करून बाद झालेला तिलक वर्मा आगामी सामन्यात फिनिशरची भूमिका पार पाडू इच्छित आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने रिंकूकडून फलंदाजीचे धडे घ्यायला सुरुवात केली आहे. रिंकू म्हणाला, “सामना कसा संपवायचा, हे मी रिंकूकडून शिकत आहे. येत्या काळातील सामन्यांमध्ये मला तशीच (रिंकूप्रमाणे) कामगिरी करायची आहे.”
दरम्यान, रिंकूने पहिल्या सामन्यात केलेले प्रदर्शन पाहिले, तर 14 चेंडूंमध्ये महत्वाच्या 22 धावा त्याने केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या एका चेंडूत संघाला फक्त एक धाव हवी होती, जी रिंकूने षटकार मारून मिळवून दिली. (Tilak Verma takes batting advice from Rinku Singh ahead of the second match against Australia)
महत्वाच्या बातम्या –
“चॅम्पियन बॅटर तयार होतोय” World Cup गाजवलेल्या श्रेयसचे अश्विनकडून कौतुक
IPL 2024 । ‘तर मुंबईच्या हाती…’, हार्दिक पंड्याच्या बातम्या वाचून अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया