---Advertisement---

देशाला अजून मिळाला नाही वनडे-कसोटीचा दर्जा, पण ‘त्याने’ जगप्रसिद्ध आयपीएल खेळत रचला इतिहास

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 10:15 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या हाय व्होल्टेज सामन्यात बेंगलोर संघाकडून सिंगापूरच्या टीम डेविड याचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याने अंतिम एकादशमध्ये त्याला स्थान दिल्यामुळे त्याचे चेन्नईविरुद्ध आयपीएल पदार्पण झाले. भलेही त्याला पदार्पणाच्या सामन्यात विशेष खेळी करता आली नाही. पण त्याने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे.

२५ वर्षीय डेविड हा त्याच्या राष्ट्रीय संघाकडून कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण न करता आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूबाबत हा अनोखा योगायोग घडलेला नाही. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये खेळणाराही पहिलावहिला सिंगापूरचा खेळाडू ठरला आहे.

खरे तर, डेविडने कसोटी आणि वनडे क्रिकेट न खेळण्यामागचे खरे कारण म्हणजे, अजून सिंगापूर संघाला या क्रिकेट स्वरुपांचा दर्जा मिळालेला नाही. तरीही डेविडने आयपीएल खेळत इतिहास रचला आहे.

डेविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंगापूरचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत या संघाकडून ११ टी२० सामने खेळले आहेत. त्याची टी२० सरासरी ४६.५० असून त्याचा स्ट्राइक रेट १५८ पेक्षा जास्त आहे. त्याने आत्तापर्यंत ३ अर्धशतके ठोकली आहेत. मात्र आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात तो फक्त एका धावेवर दुर्देवीपणे बाद झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १५ सामन्यांमध्ये ७८.७७ च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२१ पेक्षा जास्त आहे. डेविडने २ शतके आणि ५ अर्धशतके केली आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, टीम डेविड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड

महत्त्वाच्या बातम्या-

CSKvsRCB, Live: कोहली अन् पडीक्कल झंझावाती अर्धशतक, पण शेपटाची नांगी, चेन्नईला १५७ धावांचे आव्हान

Photo: गोड गुफ्तगू!! नाणेफेकीवेळी धोनी अन् कोहलीचा ‘ब्रोमान्स’ ठरला लक्षवेधी, चाहतेही फिदा

चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---